Advertisement

धोकादायक कारखान्यांचं सेफ्टी ऑडिट; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सर्व धोकादायक कारखान्यांचं सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी निर्देश दिले आहेत.

धोकादायक कारखान्यांचं सेफ्टी ऑडिट; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
SHARES

बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटात ८ जणांनी आपला जीव गमावला असून, अनेकजण जखमी झाले. मात्र, आता यासारख्या पुन्हा घटना घडू नये यासाठी सर्व धोकादायक कारखान्यांचं सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी निर्देश दिले आहेत. या स्फोटाबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत ही पाहणी करावी, असं त्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजय मेहता उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देत अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने कठोर पावलं उचलावी, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी प्रधान सचिव (कामगार) करणार आहेत. तसंच, जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी डोंबिवली इथं प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. अशा स्वरूपाच्या घटना घडून औद्योगिक सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील एएनके फार्मा या रासायनिक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटानंतर तिसऱ्या दिवशीही या प्रकरणी बोईसर पोलीस स्थानकात कोणावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता.

या घटनेची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे चौकशी होणार आहे. या संचालनालयाच्या अहवालानंतरच पोलीस गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी घटनेचा अहवाल मिळावा, म्हणून बोईसर पोलिसांनी संबंधित विभागांना पत्रही दिलं आहे. पण अहवाल मिळालेला नाही. ज्या कारखान्याच्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला, तेथे बांधकाम सुरू असतानाच रासायनिक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.



हेही वाचा -

तर, शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करा, उदयराजेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

वाडिया रुग्णालयाचे भवितव्य महापालिकेच्या बैठकीवर अवलंबून



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा