कलानगर उड्डाणपूल गुरूवारी रात्रीपासून अंशत: बंद


SHARE

मुंबई - पश्चिम द्रुतगती मार्गावरील कलानगर उड्डाणपूल (प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपूल) गुरूवारी रात्री उशिरापासून वाहतुकीसाठी अंशत: बंद करण्यात येणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी गुरूवारी रात्रीपासून सोमवारी 30 जानेवारीला सकाळी सहा वाजेपर्यंत पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. सोमवारी सकाळी दुरूस्तीचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल. तीन दिवस पूल अंशत: बंद राहणार असल्यानं या काळात पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या