Advertisement

तुरूंगातील बिल्डरला महारेराचा दणका, आठवड्याभरात घराची नोंदणी करून घेण्याचे आदेश


तुरूंगातील बिल्डरला महारेराचा दणका, आठवड्याभरात घराची नोंदणी करून घेण्याचे आदेश
SHARES

घराची रक्कम वसूल करूनही घराचा करारनामा-नोंदणी करून न देणाऱ्या तेजपाल रूपजी बिल्डरला अखेर महारेराने दणका दिला आहे आणि तेही रूपजी तुरूंगात असताना. महारेराच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार आठवड्याभरात तक्रारदाराच्या घराची नोंदणी करून देण्याचे आदेश या बिल्डरला दिले आहेत.

रसिया मोहम्मद इक्बाल गौर या महिलेने 2013 मध्ये रुपजी कन्स्ट्रक्शनच्या एका गृहप्रकल्पात 53 लाखांचे घर खरेदी केले. 53 लाखांपैकी 41 लाखांची रक्कम भरली. रक्कम भरून चार वर्षे झाली, तरी बिल्डरने घराचा करारनामा केला नाही कि घराचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) केली नाही. त्यामुळे गौर यांनी ऑगस्टमध्ये याविषयी महारेराकडे तक्रार दाखल केली.

ही तक्रार दाखल झाल्याबरोबर बिल्डरने 31 ऑगस्टला गौर यांच्या घराची नोंदणी करून दिली. मात्र, महारेराकडे नोंदणी केलेल्या रुपजी कन्स्ट्रक्शनच्या या गृहप्रकल्पाच्या पूर्णत्वाची तारीख 2019 अशी नोंदवण्यात आली आहे. तर इतर ग्राहकांच्या करारानामा-नोंदणीच्या कागदपत्रातही 2019 अशीच तारीख आहे. असे असताना गौर यांच्या नोंदणीच्या कागदपत्रात मात्र बिल्डरने 2019 एवजी 2022 अशी प्रकल्प पूर्णत्वाची, ताबा देण्याची तारीख नोंदवण्यात आली आहे.

बिल्डर आपली फसवणूक करत असल्याचा दावा करत या महिलेने महारेराकडे दाद मागितली. त्यानुसार 29 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रूपजी बिल्डर दुसऱ्या कुठल्या एका प्रकरणात तुरूंगात असल्याचे स्पष्ट झाले. तर रूपजी कन्स्ट्रक्शनकडून 3 ऑक्टोबरला बिल्डरला जामीन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार महारेराने 3 ऑक्टोबरला बिल्डर जामिनावर बाहेर आल्याबरोबर आठवड्याभरात नव्याने नोंदणी करून देण्याचे आदेश देत ही तक्रार निकाली काढली आहे.



हेही वाचा

'महारेरा'त तक्रार दाखल झाली नि 'लोढा' बिल्डर नरमले!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा