Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

'महारेरा'त तक्रार दाखल झाली नि 'लोढा' बिल्डर नरमले!


'महारेरा'त तक्रार दाखल झाली नि 'लोढा' बिल्डर नरमले!
SHARES

आयुष्यभराची कमाई जमवून स्वत:चं घर खरेदी केलं... पण फसव्या बिल्डरमुळं घराच्या स्वप्नावर पाणी पडलं... असं जर तुमच्याबाबतीत घडलं असंल, तर पुढं या आणि 'महारेरा'त तक्रार करा... कारण 'महारेरा' अशा फसव्या बिल्डरांकडून तुमची रक्कम परत मिळून देण्यास नक्कीच मदत करेल. मागील दोन निकालातून 'महारेरा'नं हे दाखवून दिलं आहे. 

याआधी एकता बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकाची 26 लाखांची घराची रक्कम परत मिळवून दिल्यानंतर आता 'महारेरा'नं आणखी एका ग्राहकालाही न्याय दिला आहे. एका प्रकरणात बांधकाम क्षेत्रात दबदबा असणाऱ्या 'लोढा' बिल्डरच्या खिशातून रक्कम काढून 'महारेरा'नं  ग्राहकाची रक्कम परत मिळवून दिली आहे.

ठाण्यातील 'अल्टीमा' या लोढा बिल्डरच्या गृहप्रकल्पात रोशन रामनाथ नेवाळे यांनी 1 लाख 8 हजार रुपये भरत घराची नोंदणी (बुकींग) केली. पण काही कारणानं त्यांनी हे घर घेण्याचा निर्णय बदलत नोंदणी रद्द करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी लोढा बिल्डरकडं घराच्या नोंदणीची रक्कम परत मागितली. पण 'लोढा'नं ही रक्कम परत करण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी नेवाळे यांनी 'महारेरा'त लोढा बिल्डरविरोधात तक्रार केली.


सांमजस्यानं तक्रार निवारण

'महारेरा'त तक्रार गेल्याबरोबर लोढा बिल्डर नरमले आणि त्यांनी ग्राहकाला नोंदणीची रक्कम परत करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार मंगळवारी यासंबंधीची अंतिम सुनावणी घेत 'महारेरा'नं सांमजस्यानं निवारण केलं आहे. दरम्यान बड्या-बड़्या बिल्डरांकडून कशा प्रकारेच ग्राहकांची फसवणूक होत आहे, हे महारेराच्या माध्यमातून उघड होत आहे. तर दुसरीकडं सांमजस्यानं का होईना, पण ग्राहकांची रक्कम परत मिळत असल्याने ग्राहकांसाठी हा दिलासा ठरत आहे.हे देखील वाचा -

रेराची बिल्डरांवर मेहेरनजर सुरूच, 16 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या प्रकल्पांना नाममात्र दंडडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा