...हे आहे मुंबईतलं सर्वात महागडं घर


SHARE

गेल्या काही दिवसांपासून रिअल इस्टेटच्या बाजारात मंदीचे सावट आहे. त्यातच मुंबईत एका फ्लॅटची विक्री 45 कोटीला झाल्याने रिअल इस्टेट बाजारात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दक्षिण मुंबईतल्या भुलाभाई देसाई रोड येथे ऍशफर्ड पलाजो ही 19 मजली इमारत आहे. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकच फ्लॅट आहे. 45 कोटीला विक्री झालेला 2152 चौरस फुटांचा हा फ्लॅट 16 व्या मजल्यावर आहे. जो प्रति चौरस फूट दोन लाख 9 हजार रुपये दराने विकला गेला आहे. एम्पायर इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष रंजित मल्होत्रा यांनी हा फ्लॅट विकत घेतला आहे. नोंदणीनुसार फ्लॅटचा बिल्ट अप एरिया 2152 चौरस फूट तर कार्पेट एरिया 1585 चौरस फूट आहे.

या इमारतीच्या खालच्या सात मजल्यांवर पार्किंग, जिम, बँक्वेट हॉल, प्ले एरिया आणि एक सर्व्हिस फ्लोअर आहे. याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर रंजित यांच्या पत्नी उमा यांच्या नावावरही एक फ्लॅट आहे. तोही 45 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. या दोन्ही फ्लॅटची विक्री एकाच दिवशी झाली.हेही वाचा - 

'महारेरा'चा पहिला दणका; 'साई रिअल इस्टेट'ला सुमारे सव्वा लाखाचा दंड


संबंधित विषय
ताज्या बातम्या