ब्रिज की बाजार?

 Mulund
ब्रिज की बाजार?
ब्रिज की बाजार?
See all

मुलुंड - पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर सध्या अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढलय. अनेक विक्रेते या पुलावर ठाण मांडून बसलेत. यामुळे नागरिकांना पुलावरून ये जा करण्यासाठी अपुरी जागा मिळत आहे. महानगर पालिकेची अतिक्रमण हाटवणारी गाडी किंवा माणसे येताच हे फेरीवाले आपापले सामान उचलून पळ काढतात. आणि पालिकेची गाडी जाताच हे फेरीवाले पुन्हा येथे विक्री करण्यासाठी बसतात. या विक्रेत्यांना जर विक्रीसाठी हक्काची अशी दुसरी जागा पालिकेने मिळवून दिली तर कदाचित पुलावरील जागा मोकळी होईल असं इथल्या नागरिकांच म्हणणं आहे.

Loading Comments