Advertisement

१५ महिन्यात तयार होईल डोंबिवलीचा मानकोली पूल

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनीही बुधवारी अधिकाऱ्यांसोबत सभा घेतली. या बैठकीत पुलाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला.

१५ महिन्यात तयार होईल डोंबिवलीचा मानकोली पूल
SHARES

कल्याण आणि डोंबिवलीतील रहदारी अधिक सोपी करण्यासाठी येत्या १५ महिन्यांत मानकोली पूल तयार करण्यात येणार आहे. हा पूल पूर्ण करण्यासाठी MMRDAनं मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनीही बुधवारी अधिकाऱ्यांसोबत सभा घेतली. या बैठकीत पुलाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला.

वाहतुकिसाठी हा प्रकल्प कल्याण आणि डोंबिविलमध्ये खूप महत्वाचा मानला जात आहे. या पुलाच्या निर्मितीनंतर दोन्ही भागातल्यांना रहदारीसाठी लागणारा वेळ खूप कमी होऊ शकेल. कल्याण डोंबिलवीतील रहदारीची समस्या सोडवण्यात हा पूल खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो.

पुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया ८० टक्के पूर्ण झाली आहे. उरलेली २० टक्के कामं लवकरच पूर्ण केली जातील. एमएमआरडीएमार्फत १ हजार २२५ मीटर लांब आणि २७.५ मीटर रुंदीच्या पुलावर काम सुरू आहे. यासोबतच कल्याण रिंग रूट विभाग 3 जोडण्याचं काम देखील त्याच वेळी पूर्ण होऊ शकेल.



हेही वाचा

हँकाॅक पूल डिसेंबरअखेर वाहतुकीस खुला

मोनो रेल्वेला 'या' टॉवरमुळं मिळणार दुप्पट महसूल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा