Advertisement

मोनो रेल्वेला 'या' टॉवरमुळं मिळणार दुप्पट महसूल

मोनो रेलला दुप्पट उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

मोनो रेल्वेला 'या' टॉवरमुळं मिळणार दुप्पट महसूल
SHARES

मुंबईतील अनेक रहिवाशी लोकलनं प्रवास करत असून, लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळं धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. तसंच, निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळं या प्रवाशांना आरमदायी व गारेगार प्रवासाची संधी मिळावी यासाठी मुंबईत मोनोरेलची वाहतूक सेवा उपलब्ध करण्यात आली. परंतु, प्रवाशांच्या प्रवासातून म्हणजेच तिकीटांमधून मोनोरेलला पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. परंतु, आता मोनो रेलला दुप्पट उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मोनो रेलच्या २० किमी लांबीच्या मार्गिकेवर असलेल्या ७०० पिलर्सवर आता मोबाइल टॉवर्स बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मोनोच्या तिकीट विक्रीतून जेवढे उत्पन्न एमएमआरडीएला मिळते त्याच्या किमान दुप्पट महसूल या टॉवर्सच्या माध्यमातून मिळू शकेल असा प्राथमिक अंदाज आहे. मोनो रेल्वेतून लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी दैनंदिन १० हजार प्रवासीसुद्धा प्रवास करीत नव्हते. प्रवासी संख्या अत्यल्प असल्यानं वर्षाकाठी जेमतेम ६ कोटींचं उत्पन्न तिकीट विक्रीतून मिळते. त्यापेक्षा जास्त खर्च केवळ सुरक्षा रक्षक आणि श्वानपथकांवर होत आहे.

उत्पन्न वाढत नसताना खर्चाचे आकडे मात्र भरारी घेत आहेत. त्यामुळं जाहिराती, मोबाइल टॉवर्स, जागांचा व्यावसायिक वापर अशा विविध माध्यमांतून पर्यायी उत्पन्नाचं स्रोत निर्माण करण्याचा मानस आहे. त्यातूनच मोनोच्या ७०० पिलर्सवर मोबाइल नेटवर्कसाठी टॉवर्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॉवर्सची जागा भाडे तत्त्वावर दिल्यानंतर त्या माध्यमातून १२ ते १५ कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या टॉवर्सच्या माध्यमातून किती महसूल मिळू शकेल, कोणत्या कंपन्या त्यात स्वारस्य दाखवू शकतात, या धोरणाच्या अटी-शर्थी काय असाव्यात? अशा विविध आघाड्यांवर अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीए सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.

  • ऑगस्ट अखेरीपर्यंत ही नियुक्ती होईल अशी अपेक्षा आहे. 
  • पात्र सल्लागाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील महिन्याभरात त्यांच्याकडून सविस्तर अहवाल प्राप्त होईल.
  • मोबाइल कंपन्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल. 
  • सल्लागार कंपनीच या निविदांच्या अटी-शर्थी ठरविण्यासाठी अन्य आघाड्यांवर मदत करणार आहे.
  • त्या सर्व कामासाठी सल्लागारांना १६ लाख ५० हजार रुपये देण्याची तयारी असल्याचं समजतं.



हेही वाचा -

Best Mini Ac Bus कोरोनाच्या भीतीनं प्रवासी टाळताहेत बेस्टच्या मिनी एसी बसचा प्रवास

मुंबईच्या या परिसरात दिवसेंदिवस वाढते कोरोनाग्रस्तांची संख्या



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा