Advertisement

हँकाॅक पूल डिसेंबरअखेर वाहतुकीस खुला

मध्य रेल्वेच्या सॅन्डहर्स्ट रोड – भायखळा रेल्वे स्थानक दरम्यानचा १३५ वर्ष जुना हॅँकॉक पूल धोकादायक ठरल्याने ९ जानेवारी २०१६ मध्ये पाडण्यात आला.

हँकाॅक पूल डिसेंबरअखेर वाहतुकीस खुला
SHARES

मागील चार वर्षांपासून हँकाॅक पुलाचं काम रखडलं होतं. मात्र, आता या कामाला सुरुवात झाली. रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक घेत पुलाचा गर्डर टाकण्यात आला. डिसेंबर अखेरपर्यंत एका बाजुने वाहतुकीस पूल खुला करण्यात येणार असून मार्च २०२१ पर्यत पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

मध्य रेल्वेच्या सॅन्डहर्स्ट रोड – भायखळा रेल्वे स्थानक दरम्यानचा १३५ वर्ष जुना हॅँकॉक पूल धोकादायक ठरल्याने ९ जानेवारी २०१६ मध्ये पाडण्यात आला. पूल पाडल्यामुळे माझगाव, मस्जिद बंदर आदी परिसरातील लोकांना भायखळा पूर्व – पश्चिमेला ये-जा करताना वळसा घालून जावे लागत आहे. या पुलाच्या कामासाठी दोन ते तीन वेळा मुहूर्त काढण्यात आला. मात्र पुलाखालून ४८ इंचाची जलवाहिनी जात होती. तर पुलाशेजारील झोपडीधारकांना हटवणे मुश्कील झालं होतं. पूल पाडून वर्ष झाले तरी बांधला का जात नाही, याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पालिका व मध्य रेल्वे प्रशासनाची कानउघाडणीही केली होती. अखेर जलवाहिनी व झोपडीधारकांचा अडथळा दूर करण्यात पालिकेला यश मिळालं आहे.

पूलाचा पाया टाकण्याचं काम आता पूर्ण झालं आहे. पुलासाठी १३०० टन वजनाचे दोन गर्डर चंदीगड येथून मागवण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली होती. मात्र, आता खर्चात २५ कोटींची वाढ झाली आहे. आधी ५१ कोटींचा खर्च येणार होता.  आता ७७ कोटी ४२ लाख रुपये खर्च येणार आहे.


हेही वाचा -

दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा