Advertisement

आम्ही 'सेलिब्रिटी लाभार्थी', स्वरांगी मराठे, मिलिंद शिंदेला लागलं म्हाडाचं घर

म्हाडाच्या मुंबईच्या लाॅटरीत कांदिवलीतील घरासाठी मिलिंद शिंदे विजेते ठरले आहेत. ते देखील कलाकार कोट्यातून नव्हे, तर सामाजिक आरक्षणातील प्रवर्गातून त्यांना घरं लागलं हे विशेष.

आम्ही 'सेलिब्रिटी लाभार्थी', स्वरांगी मराठे, मिलिंद शिंदेला लागलं म्हाडाचं घर
SHARES

तुम्हारी शरण मै तांबडे बाबा... या ओळी आणि या ओळींमुळे जनसामान्यांच्या मनावर आपली छाप उमटवणारा अभिनेता म्हणजे मिलिंद शिंदे. आजही अनेकजण मिलिंद शिंदे यांना तांबडे बाबा म्हणूनच ओळखतात. पण या तांबडेबाबाचं मुंबईत कालपर्यंत हक्काचं घर नव्हतं हे वाचून कदाचित तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. मात्र शुक्रवारी त्यांच्या घराचं स्वप्न साकार झालं आहे. म्हाडाच्या मुंबईच्या लाॅटरीत कांदिवलीतील घरासाठी मिलिंद शिंदे विजेते ठरले आहेत. ते देखील कलाकार कोट्यातून नव्हे, तर सामाजिक आरक्षणातील प्रवर्गातून त्यांना घरं लागलं हे विशेष.


मालाड ते कांदिवली व्हाया आमदार निवास

मिलिंद शिंदे मूळचे नगरचे. काही वर्षांपूर्वीच ते मुंबईत राहायला आले. अभिनय क्षेत्रात कारकिर्द सुरू होती. पण मुंबईतं स्वत:चं काय भाड्याचं घर घ्यावं इतकाही पैसा नसल्यानं त्यांचा तब्बल ५ वर्षे मुक्काम होता तो आमदार निवासात. इतका मोठा कलाकार ५ वर्षे आमदार निवासात राहतो आणि त्याचं मुंबईत घर नाही हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. पण हे खरं आहे. मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्नही आपल्याला परवडणारं नाही असं मानणाऱ्या मिलिंद शिंदे यांनी म्हाडाच्या माध्यमातून घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आणि शुक्रवारी अखेर ते स्वप्न पूर्ण झालं.

मिलिंद शिंदे यांना कांदिवलीतील मध्यम उत्पन्न गटात घर लागलं असून आता आपण खऱ्या अर्थाने मुंबईकर झाल्याचं 'मुंबई लाइव्ह'ला सांगताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.



मुंबईतील घरांच्या किंमती कोटीच्या कोटीची उड्डाणं घेत असताना माझ्यासारख्या एका छोट्या गावातून आलेल्या व्यक्तिला मुंबईत घर घेण्याचा विचारही परवडणारा नव्हता. याआधी म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी पैसेही माझ्याकडे नव्हते. पण नंतर मात्र हळूहळू मी रक्कम जमवली आणि यंदा थेट ८ अर्ज भरले. त्यातूनच मला घर लागलं. खूप भारी वाटतंय.
- मिलिंद शिंदे, अभिनेता


अभिनेत्री आणि गायिका स्वरांगी मराठे हिचंही घराचं स्वप्न म्हाडाने पूर्ण केलं आहे. स्वरांगी सध्या ठाण्याला राहते. शुटींग किंवा गाण्याचे कार्यक्रम बहुधा पश्चिम उपनगरातच असतात. त्यामुळे रात्री उशीरा शुटींग वा कार्यक्रम संपल्यानंतर ठाण्याचं घर गाठणं मोठं अवघडं ठरतं. म्हणूनच स्वरांगीला गोरेगाव ते बोरीवलीदरम्यान घर हवं होतं. त्यामुळं तिने पहिल्यांदाचं म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आणि एका फटक्यात ती म्हाडाच्या घरासाठी विजेती ठरली. मुंबईत घर लागल्याने आनंदी असलेल्या स्वरांगीने आता आपल्या या नव्याकोऱ्या घराचे वेध लागल्याचे सांगत घराची पुढची प्रक्रिया पूर्ण करत घराचा ताबा घेणं हेच आता महत्त्वाचं असल्याचं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे.



अर्ज भरण्यासाठी दोन दिवस उरले असताना, आॅनलाईन अर्ज भरण्याविषयी काहीही माहीत नसताना ही कसाबसा अर्ज भरला आणि त्यानंतर पार विसरून गेले. पण शुक्रवारी दुपारी माझ्या मित्राचा फोन आला आणि त्याने मला घर लागल्याची बातमी दिली. त्यानंतर जो काही आनंद झाला तो मी शब्दांत सांगूच शकत नाही. माझं हक्काच्या घराचं स्वप्न म्हाडानं पूर्ण केलं. त्यामुळे म्हाडाचे खूप खूप आभार.
- स्वरांगी मराठे, अभिनेत्री-गायिका



हेही वाचा-

मी लाभार्थी, व्हयं हे माझं घर!

यंदा म्हाडाचं घर हुकलं? डोन्ट वरी! पुढच्या वर्षी १ हजार घरांची लॉटरी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा