Advertisement

मी लाभार्थी, व्हयं हे माझं घर!


मी लाभार्थी, व्हयं हे माझं घर!
SHARES

'मी लाभार्थी, हे माझं सरकार' या जाहिरातींवरून सोशल मीडियात भाजपाला टार्गेट केलं जात असताना शुक्रवारी वांद्र्याच्या रंगशारदामध्ये हिंगोलीतील एक शेतकरी पत्नी अभिमानाने सांगताना दिसली, 'मी लाभार्थी, व्हयं हे माझं घरं'.

म्हाडाच्या घराची लाॅटरी लागल्याने आनंदून गेलेल्या हिंगोलीतील सुगंधा कुरूडे यांच्या तोंडातून खरोखर व्यासपीठावरून खाली आल्यानंतर 'मी लाभार्थी' हेच शब्द बाहेर पडले.


अखेर विजेता सापडला

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ८१९ घरांसाठी शुक्रवारी लाॅटरी पार पडली. यंदा लाॅटरीला म्हणावा तसा प्रतिसाद नसला, तरी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना लाॅटरीची उत्सुकता होती. त्यामुळे लाॅटरी नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडली. लाॅटरीतील विजेत्यांना व्यासपीठावर बोलवून म्हाडाकडून सत्कार केला जातो. त्याप्रमाणे लाॅटरी सुरू होऊन बराच वेळ झाला तरी सत्कारासाठी विजेता सापडत नव्हता. त्यातच एका लाॅटरीची घोषणा झाली आणि एक आजीबाई व्यासपीठावर आल्या. त्या व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. या आजीबाई म्हणजे सुगंधा कुरूडे.


गावातून थेट मेट्रो सिटीत

आतापर्यंतचं आयुष्य गावी, शेती करण्यात काढल्यानंतर मुंबईत आपलं स्वत:चं हक्काचं घर होईल, याचा विचारही कधी कुरूडे आजींनी केला नव्हता. त्यामुळे लाॅटरी लागल्यानंतरचा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.



गेल्या ४ वर्षांपासून मी म्हाडासाठी अर्ज करत होते. पण घर लागत नव्हतं. पण यंदा मला घर लागलं आणि मी खऱ्या अर्थानं सरकारच्या घराच्या योजनेची लाभार्थी ठरले. याचा मला आनंद आहे. हिंगोलीतल्या एका शेतकरी कुटुंबाचं आता मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होतयं ते फक्त म्हाडामुळंचं.
- सुगंधा कुरूडे, विजेत्या


हक्काचं घर

लाखो अर्जदारांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडातील कित्येक कर्मचाऱ्यांचं मुंबईत स्वत:चं घर नाही. अशावेळी म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या गटातून कर्मचाऱ्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं. त्याप्रमाणे यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले मोहनराव कोळी यांनाही मुंबईत हक्काचं घर मिळालं आहे, तेही म्हाडाच्याच माध्यमातून.

कोळी यांना गोरेगावमध्ये म्हाडा कर्मचारी प्रवर्गातून घर लागलं असून त्यांच्याबरोबर अनंत शिंदे हे म्हाडा कर्मचारीही म्हाडाच्या घरासाठी विजेते ठरले आहेत.



मी २००९ पासून घरासाठी अर्ज करत आहे. पण मला लाॅटरी लागत नव्हती. माझं नाव नेहमीच प्रतिक्षा यादीवर यायचं. मात्र यंदा नंबर लागला. गेल्या कित्येक वर्षांपासून मी म्हाडाच्या निवासस्थानात राहतोय. आता माझं स्वत:चं हक्काचं घर मुंबईत पूर्ण होणार आहे आणि तेही ज्या म्हाडात मी काम करतो त्या म्हाडाच्याच माध्यमातून.
- मोहनराव कोळी, विजेते



हेही वाचा-

यंदा म्हाडाचं घर हुकलं? डोन्ट वरी! पुढच्या वर्षी १ हजार घरांची लॉटरी

खूशखबर, गोरेगावातील ‘त्या’ जागेवर म्हाडा बांधणार ५ हजार घरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा