Advertisement

‘मिठी’वरही मेट्रो घाव?


‘मिठी’वरही मेट्रो घाव?
SHARES

मुंबई - आरेप्रमाणे मिठी नदीवरही घाव घातला जाणार आहे. मेट्रो 3 प्रकल्पातील बीकेसी मेट्रो स्थानकासाठी इनकम टॅक्स ऑफिसच्या मागील मिठी लगतची तब्बल 154 झाडं कापली जाणार आहेत. इतकंच नव्हे तर येथील तिवरांची कत्तल केली जाणार आहे. या झाडांच्या कत्तलीसाठी एमएमआरसीने वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अजून या प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याची माहिती एमएमआरसीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तर तिवरांच्या कतलीबद्दलची माहिती सध्या उपलब्ध नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. मिठी लगतची झाडं तोडल्यास तिवरांची कत्तल केल्यास मुंबईत 26 जुलैची पुनरावृत्ती होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता ही गंभीर बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत मिठी वाचवण्याचा निर्णय सेव्ह ट्री ने घेतला आहे आहे. तर यासाठी सरकारकडे पाठपुरावा ही केला जाणार आहे. त्यामुळे आता आरे कारशेडप्रमाणेच बीकेसी मेट्रो स्थानकावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा