Advertisement

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरून धावणार मेट्रो ४


गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरून धावणार मेट्रो ४
SHARES

मेट्रो ४ प्रकल्पापुढील मोठा अडथळा दूर झाल्याने या मेट्रोचे काम लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. मेट्रो ४ च्या मार्गात गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर)प्रकल्पाचे काम आडवे येत असल्याने हा प्रकल्प रखडला होता. परंतु दोन्ही प्राधिकरणांनी यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. या तोडग्यानुसार आता मेट्रो ४ प्रकल्प गोरेगाव-मुलुंड लिंकवरून बांधण्यात येईल.

पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणारा 'जीएमएलआर' हा मुंबई महापालिकेचा २००० हजार कोटी रुपयांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

तर, वडाळा-कासरवडावली असा १४,५४९ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो ४ चा मार्ग आहे. मेट्रो ४ च्या ब्ल्यू प्रिंटचे काम सुरू असताना आरेखनकर्त्यांपुढे मोठी अडचण आली. ती अशी की भांडुपच्या एलबीएस रोडवर जेथे 'जीएलएमआर'च्या उड्डाणपुलासाठी पिलर्स उभारण्यात येत आहेत; नेमक्या त्याच मार्गावर अवघ्या ६ ते ८ मीटरच्या अंतरावर मेट्रोच्या पिलर्ससाठी जागेचे आरेखन झाल्याने हे दोन्ही प्रकल्प अडकले. त्यानंतर दोन्ही प्राधिकरणाने यावर तोडगा काढण्यासाठी मेट्रो ४ 'जीएलएमआर'च्या वरून थोड्या अधिक उंचीवरून बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही प्रकल्प समान मार्गावर असले, तरी त्यामध्ये ६ ते ८ मीटरचे अंतर असेल. 'जीएमएलआर'चे पिलर्स काहीसे उजव्या बाजूला असतील, तर मेट्रोचे पिलर्स डाव्या बाजूला असतील. हे दोन्ही पिलर्स एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घेण्यात अालेली आहे. असे करताना दोन्ही प्रकल्पाच्या खर्चात कुठलीही वाढ होणार नाही.



हे देखील वाचा - 

मेट्रो - 4 आणि मेट्रो - 2 ब साठी दहा कंपन्या उत्सुक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा