Advertisement

मेट्रो -1 चा गो ग्रीन उपक्रम


मेट्रो -1 चा गो ग्रीन उपक्रम
SHARES

मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गात आता लवकरच सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. विजेची बचत करण्यासाठी मुंबई मेट्रो वन कॉर्पोरेशन (एमएमओपीएल)ने गो ग्रीनची हाक देत सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिन्याभरात सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करत त्याद्वारे अधिकाधिक विजेची बचत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे एमएमओपीएलने सांगितले आहे. मेट्रो-1 मधील मेट्रो स्थानकात, कार डेपोत आणि प्रशासकीय इमारतीत एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. त्यात आता सौर ऊर्जेचा वापर केला जाणार असल्याने विजेची आणखी बचत होणार आहे. दरम्यान सौर ऊर्जेचा वापर हा केवळ मेट्रो स्थानक, कार डेपोतील दिवे आणि इतर विजेच्या वापरासाठी करण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा