Advertisement

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग, आतापर्यंत ४९ प्रस्तावांना मंजुरी

गेल्या वर्षभरात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे १०७ प्रस्ताव सादर झाले असून त्यातील ४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग, आतापर्यंत ४९ प्रस्तावांना मंजुरी
SHARES

म्हाडाला ५ महिन्यांपूर्वीच 'स्पेशल प्लानिंग अॅथाॅरिटी' अर्थात विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाला आहे. तर दुसरीकडे म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचं नवं धोरण रहिवाशी आणि बिल्डरांना परवडत आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आता मार्गी लागताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे १०७ प्रस्ताव सादर झाले असून त्यातील ४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


पुनर्विकास रखडण्याचं कारण

मुंबईत म्हाडाच्या ५६ वसाहती असून ११४ लेआऊट अर्थात अभिन्यास आहेत. या म्हाडा वसाहतीतील अनेक इमारती मोडकळीस आल्यानं त्यांचा शक्य तितक्या लवकर पुनर्विकास मार्गी लावणं गरजेच आहे. मात्र २०१० पासून या वसाहतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. म्हाडा प्राधिकरणानं सप्टेंबर २०१० मध्ये पुनर्विकास धोरणात मोठा बदल केला. प्रीमियमचा पर्याय रद्द करत केवळ आणि केवळ हाऊसिंग स्टाॅकनेच पुनर्विकासाला परवानगी देण्याचं धोरण आणलं. म्हाडाला अधिकाधिक अतिरिक्त घर मिळवून देणारं हे धोरण बिल्डरांना रूचलं नाही. त्यामुळं हाऊसिंग स्टाॅक घेत पुनर्विकासासाठी एक बिल्डर पुढेच आले नाहीत आणि पुनर्विकास रखडला.


धोरणात पुन्हा बदल

अखेर यातून मार्ग काढण्यासाठी पुनर्विकास धोरणात पुन्हा बदल करण्यात आला. प्रीमियम आणि हाऊसिंग स्टाॅक असे दोन्ही पर्याय देण्यात आले. एकीकडे हे धोरण आले तर त्यापाठोपाठ म्हाडाला पंतप्रधान आवास योजना आणि म्हा़डा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला. तर हा दर्जा मिळाल्यानंतर म्हाडाकडून दोन स्वतंत्र कक्ष पुनर्विकासाचे प्रस्ताव वेगाने मार्गी लावण्यासाठी तयार करण्यता आले. त्यानुसार अभिन्यास मंजुरी कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्ष असे कक्ष आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुनर्विकासाला वेग आल्याचं चित्र आहे.


१५ प्रस्ताव नामंजूर

मुंबई मंडळातील वरिषअठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १०७ प्रस्ताव सादर झाले आहेत. त्यातील ४९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तर हे सर्व प्रस्तावांना प्रीमियम आकारत मंजुरी देण्यात आली आहे. तर १५ प्रस्ताव नामंजूर करत पुन्हा सोसायट्यांकडे पाठवण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्तावांची छाननी सुरू असून या प्रस्तावाबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल.हेही वाचा-

म्हाडा झालं नियोजन प्राधिकरण, प्रकल्पांना मिळणार गती

Mumbai Live Impact: म्हाडाच्या घरांच्या किंमती घटल्या; परळमधील दीड कोटीचं घर केवळ ९९ लाखांतRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा