Advertisement

म्हाडाचा रेकाॅर्ड! लॉटरीच्या दुसऱ्याच दिवशी दिलं विजेत्यांना 'ऑफर लेटर'

लॉटरीतील विजेत्यांना घर लागल्यापासून ते 'देकार पत्र' म्हणजेच 'ऑफर लेटर' मिळेपर्यंत विजेत्यांच्या नाकीनऊ येतात. त्यासाठी १ वर्षांपासून ४ वर्षांचा काळही जातो. पण कोकण मंडळाने लॉटरी झाल्यानंतर ४८ तासांत पात्रता निश्चित करत काही विजेत्यांच्या हाती 'ऑफर लेटर' सोपवत त्यांना खूश केलं आहे.

म्हाडाचा रेकाॅर्ड! लॉटरीच्या दुसऱ्याच दिवशी दिलं विजेत्यांना 'ऑफर लेटर'
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरासाठी शनिवारी लॉटरी फुटली. या लॉटरीला थंड प्रतिसाद लाभला असला, तरी या लॉटरीने नवा इतिहास रचला आहे. लॉटरीतील विजेत्यांना घर लागल्यापासून ते 'देकार पत्र' म्हणजेच 'ऑफर लेटर' मिळेपर्यंत विजेत्यांच्या नाकीनऊ येतात. त्यासाठी १ वर्षांपासून ४ वर्षांचा काळही जातो. पण कोकण मंडळाने लॉटरी झाल्यानंतर ४८ तासांत पात्रता निश्चित करत काही विजेत्यांच्या हाती 'ऑफर लेटर' सोपवत त्यांना खूश केलं आहे. कोकण मंडळाचं हे काम आश्चर्यचकीत करणारं असून यामुळे विजेत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.


विशेष शिबिराचं आयोजन

कोकण मंडळातील अनेक घरं तयार आणि ताबा देण्याजोगी आहेत. त्यामुळे मंडळानं शक्य तितक्या लवकर विजेत्यांची पात्रता निश्चित करत ताबा देण्याच उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यासाठीच लॉटरी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी म्हाडा भवनात एक विशेष पात्रता निश्चिती शिबीर भरवण्यात आलं. विजेत्यांना लॉटरीच्या दिवशीच मेसेजद्वारे कळवण्यात आलं होतं. त्या नुसार २००० विजेत्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. त्यातील काही विजेत्यांची पात्रता निश्चित करत त्यांना तिथल्या तिथे घराची रक्कम भरण्यासाठी 'ऑफर लेटर' देण्यात आलं आहे.


आधीचा वेळ

लॉटरी लागल्यापासून प्रथम सूचना पत्र ते ऑफर लेटर मिळेपर्यंत साधारणतः १ ते २ वर्षाचा काळ लागतो. कधी कधी तर ३ ते ४ वर्षे लागल्याची ही उदाहरणे आहेत. ही प्रक्रिया विजेत्यांसाठी अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरते. त्यामुळे अनेक विजेते या प्रक्रियेला कंटाळतात. कोकण मंडळाच्या २०१८ च्या लॉटरीतील विजेत्यांना मात्र म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे.



हेही वाचा-

गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी

भाजीवाल्याचं तर मूकबधीर प्रमिलाचं घराचं स्वप्न पूर्ण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा