गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी

सकाळी साडे दहाच्या सुमारास गुलझारीलाल नंदा सभागृहात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत म्हाडाच्या लाॅटरीचा शुभारंभ झाला. संकेत क्रमांक २५४ , मिरारोड, अत्यल्प गटातील अनुसूचित जातीतील १४ घरांसाठी सर्वप्रथम लाॅटरी काढण्यात आली. रंजना व्यास या पहिल्या विजेत्या ठरल्या. त्यानंतर पुढे एकाएका संकेत क्रमांकासाठी लाॅटरी निघत गेली नि लाॅटरी पार पडली.

  • गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी
  • गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी
  • गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी
  • गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी
  • गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी
  • गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी
SHARE

म्हाडाच्या मुंबई मंडळाची लाॅटरी असो वा कोकण मंडळाची लाॅटरी. लाॅटरी म्हटलं की मोठा उत्साह असतो, ढोलताशांच्या गजरात, तुतारीच्या निनादात लाॅटरी फुटते. रंगशारदा सभागृहात अर्जदारांची, प्रसारमाध्यमांची गर्दी असते. समोर लाॅटरीची प्रक्रिया सुरू असते, एक-एक संकेत क्रमांकाची लाॅटरी फुटण्यास सुरुवात होते, तसतसं सभागृहातील वातावरणही उत्साही होतं. विजेत्यांचा जाहीर सत्कार होतो. अगदी नियोजनबद्ध लाॅटरी काढली जाते. यंदा मात्र कोकण मंडळाच्या लाॅटरीत असं काहीही नव्हतं. सगळं कसं नियोजनशून्य आणि उत्साहविरहीत.लाॅटरीची मजाच गेली

कोकण मंडळानं कधी नव्हे ती रंगशारदा सभागृहाएेवजी म्हाडा भवनात लाॅटरी घ्यायचं ठरवलं नि प्रत्यक्षात जेव्हा लाॅटरी फुटली तेव्हा लाॅटरीची मजाच निघून गेली. शनिवारची लाॅटरी कधी आणि कशी झाली? हे ना अर्जदारांना कळलं, ना म्हाडा कर्मचाऱ्यांना कळलं ना प्रसारमाध्यमांना. सगळा कसा गोंधळचं.


एलईडी स्क्रीनवर लाॅटरी

लाॅटरी तिसऱ्या मजल्यावरील गुलजारी नंदा सभागृहात, मंत्र्यांची पत्रकार परिषद दुसऱ्या मजल्यावर, प्रसारमाध्यमांची बसण्याची व्यवस्था पहिल्या मजल्यावर तर अर्जदार मात्र भवनाच्या आवारातील मंडपात. त्यामुळे लाॅटरी सर्वांनीच पाहिली ती केवळ एलईडी स्क्रीनवर ती ही गोंधळाच्या वातावरणात.


असा झाला शुभारंभ 

सकाळी साडे दहाच्या सुमारास गुलझारीलाल नंदा सभागृहात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत लाॅटरीचा शुभारंभ झाला. संकेत क्रमांक २५४ , मिरारोड, अत्यल्प गटातील अनुसूचित जातीतील १४ घरांसाठी सर्वप्रथम लाॅटरी काढण्यात आली. रंजन व्यास या पहिल्या विजेत्या ठरल्या. त्यानंतर पुढे एकाएका संकेत क्रमांकासाठी लाॅटरी निघत गेली नि लाॅटरी पार पडली.


५५,३२४ अर्जदार स्पर्धेत

९०१८ घरांसाठी ५५ हजार ३२४ अर्जदार स्पर्धेत होते. त्यानुसार अंदाजे १७०० हून अधिक घरांसाठी अर्जच न आल्यानं शनिवारी प्रत्यक्षात अंदाजे ७३०० घरांसाठीच लाॅटरी पार पडली. ज्या घरांसाठी अर्ज आले नाहीत, ती घरं आता प्रतिक्षायादीवरील विजेत्यांना वितरीत होणार असल्यानं यंदा प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या असून त्यांनाही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.


गोंधळाचं वातावरण

शनिवारी गोंधळाच्या वातावरणात कोकण मंडळाची लाॅटरी पार पडली. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये होणारी मुंबई मंडळाची लाॅटरी अशीच म्हाडा भवनात गोंधळाच्या वातावरणात पार पडणार का? अशीच चर्चा यावेळी रंगली होती. तर मुंबईची लाॅटरी रंगशारदामध्येच पार पडावी अशीच अपेक्षा अर्जदारांसह सर्वांककडून व्यक्त होत होती. तेव्हा मुंबई मंडळाची लाॅटरी नेमकी आता कुठे फुटते हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.


माझ्या नवऱ्यानं याआधी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता. पण घर लागलं नाही. आता मी पहिल्यांदाच अर्ज केला नि मला घर लागलं तेही सर्वसाधारण गटातून. त्यामुळे खूप आनंद होत आहे. कल्याणला मला घर लागलं आहे. जोगेश्वरीतून कल्याणला जाणं जरा अवघड वाटतंय. पण भाड्याच्या घरातून हक्काच्या घरात जाणारं ही मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. आता हे घर कधी पाहणार याचेच वेध लागले आहेत.

- कल्पिता महाडिक, विजेतीमाझं स्वतचं घर असावं अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी म्हाडाच्या कोकण मंडळासाठी अर्ज केला आणि माझं हक्काच्या घराचं स्वप्न आज पूर्ण झालं. खूप आनंद होतोय. कल्याणमध्ये माझं हक्काचं घर आता होणार आहे या विचारानेच मी खूप आनंदीत झालो आहे.
- संजय डगळे, विजेताहेही वाचा - 

खूशखबर, नोव्हेंबरमध्ये 1000 घरांची लॉटरी!

अभिनंदन ! ७५४ अर्जदारांना लाॅटरीआधीच लाॅटरी
संबंधित विषय
ताज्या बातम्या