खूशखबर! नोव्हेंबरमध्ये १००० घरांची लॉटरी!

मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हेच हजारो इच्छुकांचं स्वप्न असतं. त्यामुळे या इच्छुकांचं लक्ष असतं ते मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे. पण गेल्या मे महिन्यापासून मुंबई मंडळाची लॉटरी हुलकावणी देत असून इच्छुकांची प्रतीक्षा वाढत आहे. आता मात्र या इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे.

SHARE

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी म्हाडा भवनात लॉटरी काढण्यात आली खरी. अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्णही झालं. पण मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हेच हजारो इच्छुकांचं स्वप्न असतं. त्यामुळे या इच्छुकांचं लक्ष असतं ते मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे. पण गेल्या मे महिन्यापासून मुंबई मंडळाची लॉटरी हुलकावणी देत असून इच्छुकांची प्रतीक्षा वाढत आहे. आता मात्र या इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे.


खूशखबर...

मुंबई मंडळाकडून मुंबईतील अंदाजे १००० घरांसाठी दिवाळीत अर्थात नोव्हेंबरमध्ये लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीच्या मुहूर्तावर उपाध्यक्षांनी ही खूशखबर दिली आहे.


प्रतीक्षा संपली

मुंबई मंडळाकडून दरवर्षी मे महिन्यात लॉटरी काढण्यात येते. पण गेल्या वर्षी आणि यंदाही म्हाडाने ही परंपरा खंडित केली आहे. मुंबई मंडळाकडे घरच नसल्यानं, घराचा शोध संपत नसल्याने लॉटरीची मे महिन्याची डेडलाईन चुकत चालली आहे. त्यामुळे प्रतीक्षा वाढत चालली आहे. कोकण मंडळासह सिडकोची लॉटरी जाहीर झाली. पण कोकण मंडळाच्या लॉटरीला इच्छुकांनी प्रतिसाद दिला नाही. त्याचं कारण महागडी घर आणि मुंबईतच घर हवं म्हणत मुंबई मंडळाच्या लॉटरीची प्रतीक्षा. 

ही प्रतीक्षा संपली आहे. अंदाजे 1000 घरं शोधून काढली असून या घरांसाठी नोव्हेंबरमध्ये लॉटरी निघेल असं उपाध्यक्षांनी सांगितलं आहे. दरम्यान मुंबई मंडळाची रखडलेली लॉटरी दिवाळीत, नोव्हेंबरमध्ये फुटेल हे वृत्त काही दिवसांपूर्वीच 'मुंबई लाइव्ह'ने सर्वप्रथम दिलं होतं.


अल्प गटासाठीची घरं


ठिकाणघरं
पीएमजीपी, मानखुर्द114
गव्हाणपाडा, मुलुंड269
प्रतिक्षानगर, सायन84
सिद्धार्थ नगर, गोरेगाव24
पंतनगर, घाटकोपर2
टागोरनगर, विक्रोळी7
एकूण500


अत्यल्प गटासाठीची घरं


ठिकाणघरं
अॅन्टाॅप हिल, वडाळा278
दुरूस्ती मंडळाची5
एकूण283


मध्यम गटासाठीची घरं


ठिकाणघरं
कन्नमवारनगर, विक्रोळी28
महावीर नगर, कांदिवली172
पीएमजीपी, मानखुर्द16
एकूण216


उच्च गटासाठीची घरं


ठिकाण

घरं
पंतनगर, घाटकोपर2
एकूण2

(यात बदल हाऊ शकतो)हेही वाचा -

पत्राचाळ प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात, बिल्डरला मजबूत दणका

म्हाडाची यंदा 'परवडणारी' लॉटरी! अत्यल्प-अल्प गटासाठी ७८३ घरं!
संबंधित विषय
ताज्या बातम्या