Advertisement

Mhada Lottery 2023: गुरुवारपासून सुरु होणार नोंदणी प्रक्रिया, एकदाच करावा लागणार अर्ज

बदलत्या तंत्रज्ञानाच्या साथीनं आता म्हाडानंही नोंदणी प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला.

Mhada Lottery 2023: गुरुवारपासून सुरु होणार नोंदणी प्रक्रिया, एकदाच करावा लागणार अर्ज
SHARES

म्हाडाच्या घरांसाठीची नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरु होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी यापुढं कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया अंमलात आणली जाणार असून, अर्जदारांना आता एकदाच अर्ज केल्यास म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. सदरील नोंदणी प्रक्रिया गुरुवार, 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. (Mhada Lottery online process)

बदलत्या तंत्रज्ञानाच्या साथीनं आता म्हाडानंही नोंदणी प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. यामध्ये जवळपास सर्वच प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. या प्रक्रियेमध्ये अर्ज करताना अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणं अपेक्षित असेल. ज्यानंतरच अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील.

सोडतीमध्ये नाव येणाऱ्या अर्जदारांना घराचा तात्काळ ताबाही मिळणार आहे. मुख्य म्हणजे या सोडतीसाठी कुणीही नोंदणी करु शकणार आहे.

एका ठिकाणी घर घेण्यासाठीची सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदारांनी अर्ज करत पुढील प्रक्रीया पूर्ण करावी. नव्या नियमांनुसार नोंदणी करतानाच अर्जदारा (इच्छुक) पॅनकार्ड (Pancard), आधारकार्डसह (adhar card) उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे. तर, सामाजिक आणि इतर आरक्षित वर्गातील अर्जदारांनी सदरील प्रमाणपत्र, जातीचा दाखला सादर करावीत.

घर मिळताच विजेत्यांना देकार पत्र मिळाल्यानंतर त्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरल्यास अशा विजेत्यांना एका दिवसात घराची चावी मिळणार आहे. दरम्यान सोडतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, फक्त घराची चावी आणि कराराच्या कारणानंच इच्छुकांना म्हाडाच्या कार्यालयात जावं लागणार आहे.



हेही वाचा

म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल, 'इतकी' मर्यादा निश्चित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा