Advertisement

म्हाडा लॉटरी : नोंदणीसाठी आता शेवटचे ३ दिवस

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

म्हाडा लॉटरी : नोंदणीसाठी आता शेवटचे ३ दिवस
SHARES

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, इच्छुक पात्र अर्जदारांना संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी २९ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येईल.

नोंदणीसाठी आता शेवटचे ३ दिवस उरले आहेत. नोंदणीकृत अर्जदारांना ३० सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन, तसेच बँकेत अनामत रकमेचा भरणा १ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळांवर केली जाणार आहे.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे - हरकती ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे संगणकीय सोडतीचा कार्यक्रम होईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा