म्हाडाची 47 घरं विजेत्यांकडून सरेंडर


SHARE

मुंबई - म्हाडाच्या मुंबईतील घरांना मोठी मागणी आहे. तरीही म्हाडाची घरं गेल्या काही वर्षात म्हणावी तशी परवडणारी राहिलेली नाहीत. खासगी बिल्डरांच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी आहेत. पण ती घरंही सर्वसामान्यांच्या दृष्टीनं महागच आहेत. त्यामुळे सोडतीतील विजेत्यांकडून घरं परत (सरेंडर) करण्याची संख्याही गेल्या काही वर्षात वाढतेय. म्हाडा 2016 च्या मुंबई सोडतीतील 47 घरं विजेत्यांकडून सरेंडर करण्यात आल्याची माहिती म्हाडातील सुत्रांनी दिलीय.

डबल घरं लागल्यानं, आवश्यक ती कागदपत्रं नसल्यानं ही घरं सरेंडर करण्यात आल्याचं म्हाडा अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय. मात्र प्रत्यक्षात घरांच्या किंमती जास्त असल्यानं ही घरं परत केली जात असल्याचं सुत्रांनी म्हटलंय. दरम्यान सरेंडर झालेली ही 47 घरं प्रतिक्षा यादीतील विजेत्यांना वितरीत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या