Advertisement

येताहेत म्हाडाची दुकानं, लवकरच होणार ई-आॅक्शन


येताहेत म्हाडाची दुकानं, लवकरच होणार ई-आॅक्शन
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळानं ११४९ घरांसह १०८ दुकानांचं ई-आॅक्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. सायन, प्रतिक्षानगर, कुर्ला, मानखुर्द, तुंगा-पवई, मुलुंड, जोगेश्वरी, सिद्धार्थनगर, चारकोप अशा ठिकाणी ही दुकानं आहेत. या दुकानांच्या किंमती अर्थात बोली (आॅफसेट प्राईज) निश्चित करण्यात आल्या असून या किंमती २१ लाखांपासून १ कोटी १० हजार अशा असणार आहेत. या किंमतींपेक्षा जो अधिक किंमत देईल त्याला या दुकानाचं वितरण करण्यात येईल. तब्बल १० वर्षांनंतर मुंबई मंडळाकडून दुकानांचं ई-आॅक्शन होत असल्याने इच्छुकांसाठी ही आनंदाची बाब आहे.


आॅक्शनही आॅनलाइन

येत्या १० ते १५ दिवसांत मुंबई मंडळाच्या ११४९ घरांच्या लाॅटरीच्या तारखांसह दुकानांच्या ई-आॅक्शनची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं मुंबई मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबई मंडळाकडून दुकानांची आॅफसेट प्राईज जाहीर करत निविदेप्रमाणे इच्छुकांकडून अर्ज मागवले जायचे. मग अर्जांची छाननी करत ज्याने सर्वाधिक बोली लावली आहे, त्याला दुकानाचं वितरण केलं जात होतं. आता मंबई मंडळाचा सर्व कारभार आॅनलाईन झाला आहे. त्यामुळं दुकानांचं आॅक्शनही आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी संजय भागवत यांनी दिली.


'अशी' असेल प्रक्रिया

ई-आॅक्शन करण्यासाठी म्हाडाच्या आयटी सेलकडून स्वतंत्र साॅफ्टवेअर तयार करण्यात आलं असून या साॅफ्टवेअरची सध्या तपासणी सुरू आहे. भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार ई-आॅक्शनची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येईल. त्यानुसार त्या तारखेला, त्या वेळेलला ई-आॅक्शनला सुरूवात होईल. संकेत क्रमांकानुसार दुकानांचं आॅक्शन सुरू होईल. इच्छुक जिथं कुठं असतील, घरी वा आॅफिसमधून आॅनलाईन बोली लावतील. निश्चित वेळेच्या शेवटच्या ५ मिनिटांत जो कुणी अधिक बोली लावेल तो त्या दुकानासाठी विजेता ठरेल. त्यानुसार पुढील वितरणाची प्रक्रिया पूर्ण करत त्याला हे दुकान वितरीत करण्यात येईल. त्यामुळे हे ई-आॅक्शन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.


१०८ दुकानांची माहिती 'अशी'


ठिकाणदुकानांची संख्याआॅफसेट प्राईज (रुपयांमध्ये)
प्रतीक्षानगर, सायन३६२१ लाख ते ३८ लाखांपर्यंत
न्यू हिंद मिल, माझगाव०४६२ लाखांपासून पुढे
विनोबा भावेनगर, कुर्ला१४२३ लाखांपासून ४२ लाखांपर्यंत
स्वदेशी मिल, कुर्ला०५८० लाखापासून ९१ लाखांपर्यंत
तुर्भे मंडाले, मानखुर्द०७२७ लाखांपासून पुढे
तुंगा, पवई०५४२ लाखांपासून ते ६८ लाखांपर्यंत
गव्हाणपाडा, मुलुंड११४४ लाखांपासून ते १ कोटी १० हजारांपर्यंत
मजासवाडी, जोगेश्वरी०१४१ लखांपासून पुढे
शास्त्रीनगर०४४९ लाखांपासून ते ५ लाखांपर्यंत
सिद्धार्थ नगर०१९३ लाखांपासून पुढे
चारकोप, भूखंड क्र.१२०३० लाखांपासून ८० लाखांपर्यंत




हेही वाचा-

म्हाडाकडून गरीबांची चेष्टा! अत्यल्प गटातील घरं ३० लाख ७१ हजारांत!!

११९४ घर आणि १०८ दुकानांची लाॅटरी; पण तारीख काही ठरेना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा