Advertisement

प्रतीक्षा काही तासांचीच! कुणाला लागणार म्हाडाची लाॅटरी?

या लाॅटरीसाठी एकूण १ लाख ६४ हजार अर्ज म्हाडाला प्राप्त झाले असून लाॅटरी प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने जय्यत तयारी केली आहे. रविवारी अंतिम यादीतील विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी करून त्याप्रमाणे अंतिम देकारपत्र देण्यात येतील.

प्रतीक्षा काही तासांचीच! कुणाला लागणार म्हाडाची लाॅटरी?
SHARES

म्हाडाच्या १,३८४ घरांसाठीच्या लाॅटरीसाठी अवघे काही तासच शिल्लक राहिल्याने यंदा तरी लाॅटरी लागणार का? या विचाराने अर्जदारांच्या छातीतली धडधड वाढू लागली आहे. रविवारी सकाळी १० वाजता म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात ही लाॅटरी जाहीर होणार आहे. या लाॅटरीसाठी एकूण १ लाख ६४ हजार अर्ज म्हाडाला प्राप्त झाले असून लाॅटरी प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने जय्यत तयारी केली आहे. रविवारी अंतिम यादीतील विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी करून त्याप्रमाणे अंतिम देकारपत्र देण्यात येतील.


पटांगणात सोय

म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला असून तिथं ५ एलईडी स्क्रीन्स लावण्यात आले आहेत. सोबतच अर्जदारांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलाचे बंब/वाहिका, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षकाची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढंच नाही, तर त्यांच्यासाठी
चहा-पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे. अर्जदारांनी सोडत कार्यक्रमात सहभाग घेण्याकरीता स्व: ताच्या अर्जाची पोचपावती आणणं बंधनकारक राहील.


घरबसल्या लाॅटरी बघण्याची सोय

म्हाडाच्या http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून वेबकास्टींगद्वारे या सोडतीचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी साडेसात वाजेपासून हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्याही ही सोडत बघता येणार आहे.

सोडतीमधील विजेत्या तसंच प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर १६ डिसेंबर, २०१८ रोजी सांयकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल.



हेही वाचा-

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ६४ हजार अर्ज; एका घरामागे ११८ दावेदार

झेंडेंना हवंय म्हाडाचं घरं, गोरेगावसह दादरपर्यंत भरले १० अर्ज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा