मुंबई - मुंबईतील कन्व्हेयन्स न झालेल्या म्हाडा वसाहतीतील सोसायट्यांकडून सेवाशुल्काची थकित रक्कम स्वीकारण्यासाठी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय म्हाडानं घेतला. याचा म्हाडाला मोठा फायदा झाला असून दोन दिवसांत 79 लाख 61 हजार रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. 24 नोव्हेंबरपर्यंत मुंबईसह राज्यभरातल्या विभागीय मंडळांद्वारेही वसुली सुरू राहणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडेल.
दोन दिवसांतील सेवाशुल्क वसुली
शीव विभाग - 19 लाख 65 हजार
धारावी विभाग - 11 लाख
चेंबूर विभाग - 7 लाख
मुलुंड विभाग - 27 लाख 58 हजार
घाटकोपर विभाग -1 लाख 50 हजार
कुर्ला विभाग - 3 लाख