म्हाडा रहिवाशांचे साखळी उपोषण

  Mumbai
  म्हाडा रहिवाशांचे साखळी उपोषण
  मुंबई  -  

  मुंबई - येत्या 25 ऑक्टोबरला जवळपास 500 रहिवाशी साखळी उपोषण करणार आहेत. राज्य सरकारने 2 सप्टेंबरला गृहनिर्माण धोरण जाहिर केलं. पण दीड महिने झाले तरी हे धोरण हवेतच आहे. धोरणाचा आराखडाच तयार नसताना केवळ राज्यातील पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन गृहनिर्माण धोरणाचे गाजर दाखवण्यात आलं. याच्याच निषेधार्थ म्हाडा रहिवाशांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. म्हाडा भवनासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं गांधीनगर म्हाडा रहिवाशी संघाचे सचिव आणि काँग्रेस नेते डॉ. विवेकानंद जाजू यांनी दिलीय. तसंच उपोषणानंतर सरकार आणि म्हाडाने गृहनिर्माण धोरण प्रत्यक्षात आणले नाही, तर मुंबईभर म्हाडा रहिवाशांच्या माध्यमातून आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही देण्यात आलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.