Advertisement

म्हाडा लवकरच ९ हजार घरांसाठी लॉटरी काढणार

या लॉटरीमध्ये तब्बल ९ हजार घरे असणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

म्हाडा लवकरच ९ हजार घरांसाठी लॉटरी काढणार
SHARES

म्हाडा यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर घरांची लॉटरी काढणार आहे. या लॉटरीमध्ये तब्बल  ९ हजार घरे असणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

या लॉटरीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी ६५०० घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी २००० घरे आणि २० टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या ५०० घरांचा समावेश आहे. मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर येथे ही घरं असणार आहेत. 

मिरारोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी १ बीएचके आणि २ बीएचके  १९६ घरे  आहेत. ठाण्यातील वर्तकनगर येथील अल्प गटातील ६७ घरे सोडतीत असून ही घरे ३२० चौ. फुटांची असून किमत ३८ ते ४० लाखांदरम्यान असेल.

विरार-बोळींजमधील १३०० घरे असून यामधील एक हजार घरे अल्प तर उर्वरित घरे मध्यम गटातील आहेत. कल्याणमध्ये २००० घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून त्याची किंमत १६ लाख रुपये असेल.

ठाणेमधील गोठेघर येथे ३०० चौ. फूटांची १२०० घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून  किंमत १७ लाख आहे. वडवली येथे २० घरे, तर कासारवडवलीत ३५० घरे अल्प गटासाठी असून किंमत १६ लाख आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा