गिरणी कामगारांसाठी खूशखबर

 Mumbai
गिरणी कामगारांसाठी खूशखबर

मुंबई - कित्येक महिने रखडलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीला अखेर मुहूर्त लागलाय. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी काढण्याचा निर्णय गिरणी कामगार संघटना आणि म्हाडा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे. या निर्णयामुळे अडीच हजारांहून अधिक गिरणी कामगारांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पनवेलमधील 2,418 घरांसाठी ही सोडत निघणार असून, कामगरांना साडे सहा लाखांत 320 चौ. फुटांचं घर मिळणार आहे. या लाँटरीसाठी म्हाडाकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचंही म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading Comments