Advertisement

५३ मेट्रो स्थानकं होणार हरित

इंडियन ग्रीन बिल्डींग काऊन्सिल (आयजीबीसी) च्या ग्रीन एमआरटीएसच्या मानांकनानुसार या ५३ मेट्रो स्थानकाचा हरित मेट्रो स्थानक म्हणून विकास केला जाणार आहे.

५३ मेट्रो स्थानकं होणार हरित
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने मेट्रो प्रकल्प राबवताना पर्यावरणपूरक असा मेट्रो प्रकल्प व्हावा याकडं आता विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आता मेट्रो २ अ, मेट्रो २ ब आणि मेट्रो ७ या ३ मेट्रो प्रकल्पातील ५३ मेट्रो स्थानकं हरित स्थानकं म्हणून विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे.


१०० टक्के एलईडी

इंडियन ग्रीन बिल्डींग काऊन्सिल (आयजीबीसी) च्या ग्रीन एमआरटीएसच्या मानांकनानुसार या ५३ मेट्रो स्थानकाचा हरित मेट्रो स्थानक म्हणून विकास केला जाणार आहे. आयजीबीसी आणि कॉन्फडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या मदतीने एमएमआरडीए हरित मेट्रो स्थानक प्रकल्प राबविणार आहे. या सर्व मेट्रो स्थानकावर १०० टक्के एलईडी विजेचा वापर करण्यात येणार आहे. तर नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यावर भर असणार आहे.


व्हीव्हीव्हीएफ तंत्रज्ञान

 जिने आणि लिफ्टसाठी व्हीव्हीव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सर्व स्थानकं आणि कार डेपोमध्येही सौर ऊर्जेचा वापर वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मेट्रो प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर हरित प्रकल्प म्हणून ओळखला जावा यादृष्टीने एमएमआरडीए विशेष प्रयत्न करणार आहे.



हेही वाचा -

म्हाडावर नामुष्की! १९ आॅगस्टची लाॅटरी २५ आॅगस्टवर

म्हाडाच्या मुंबई मंडळाचा गृहधमाका दिवाळीत!




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा