Advertisement

म्हाडाच्या मुंबई मंडळाचा गृहधमाका दिवाळीत!

कोकण मंडळाची लाॅटरी पार पडल्यानंतर काही दिवसांतच मुंबई मंडळाच्या १००० घरांच्या लाॅटरीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाचा गृहधमाका दिवाळीत!
SHARES

मुंबईच्या लाॅटरीची प्रतिक्षा करणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर आहे. मुंबई मंडळाकडून लाॅटरीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून कोकण मंडळाची लाॅटरी पार पडल्यानंतर काही दिवसांतच मुंबई मंडळाच्या १००० घरांच्या लाॅटरीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. या लाॅटरीसाठी मुंबई मंडळ दिवाळीचा मुहूर्त साधणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केला आहे. त्यामुळं दिवाळीत म्हाडाच्या मुंबई मंडळाचा धमाका होणार हे निश्चित.


'या' घरांना कमी प्रतिसाद

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांंची लाॅटरी १९ आॅगस्टला फुटणार आहे. यंदा कोकण मंडळाच्या लाॅटरीत मोठ्या संख्येनं घरं असूनही या लाॅटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचं कारण म्हणजे महागडी आणि जुनी घरं. त्यामुळं विरार-ठाण्यातल्या इतक्या महागड्या घरांच्या लाॅटरीत नशीब आजमवण्यापेक्षा म्हाडाच्या मुंबईच्या लाॅटरीतच नशीब अजमावूया असं म्हणत अनेकजण सध्या मुंबई मंडळाच्या लाॅटरीकडे डोळे लावून आहेत.


घर शोधण्यात वेळ

आधी ३१ मेला मुंबई मंडळाची लाॅटरी फुटणार होती. पण मुंबई मंडळाकडे पुरेशी घर नसल्यानं ती शोधण्यात बराच वेळ गेला. मुंबई मंडळाच्या लाॅटरी तळ्यात मळ्यातच होती. लाॅटरीची कुठलीही प्रक्रिया पुढं जात नव्हती. अशातच कोकण मंडळाकडे ९०१८ घरं उपलब्ध असल्यानं कोकण मंडळानं मुंबई मंडळाच्या आधी लाॅटरीचा बार उडवून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध करत अर्जविक्री-अर्जस्वीकृतीची प्रक्रिया सुरू केली. आताही प्रक्रिया येत्या ४ दिवसांत संपणार असून १९ आॅगस्टला लाॅटरी फुटणार आहे.


मुंबई मंडळ सज्ज

पण मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील इच्छुकांचं लक्ष हे मुंबई मडंळाच्याच लाॅटरीकडं आहे. त्यानुसार मुंबई मंडळातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला याविषयी विचारलं असता त्यांनी १००० घरांच्या लाॅटरीसाठी आम्ही सज्ज आहोत. पण सध्या कोकण मंडळाची लाॅटरी प्रक्रिया सुरू असून ही पूर्ण झाल्यानंतरच आम्ही मुंबई मंडळाची लाॅटरी जाहीर करणार आहोत. दिवाळीच्या मुहूर्तावर लाॅटरी फोडण्याचा आमचा विचार आहे, असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.



हेही वाचा-

म्हाडाची लाॅटरी लटकणार? न्यायालयात याचिका दाखल

म्हाडाची श्रीमंतांना 'लाॅटरी', उच्च गटाला १९ लाखांत तर दुर्बल गटाला १८ लाख ५० हजारांत घर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा