Advertisement

म्हाडाची लाॅटरी 'मोठी' प्रतिसाद 'छोटा'!

अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होऊन १४ दिवस झाले, तरी अर्जविक्रीचा आकडा २१ हजार २७० च्या घरात अाहे. तर अर्जस्वीकृतीचा आकडा ११ हजारांच्या घरांत आहे. हा आकडा खूपच कमी आहे. अर्जविक्री-स्वीकृतीसाठी आता केवळ ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे या ९ दिवसात अर्जविक्री-स्वीकृतीचा आकडा किती वाढेल, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

म्हाडाची लाॅटरी 'मोठी' प्रतिसाद 'छोटा'!
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी १९ आॅगस्टला लाॅटरी फुटणार आहे. म्हाडाच्या इतिहासातील एकाचवेळी फुटणारी ही सर्वात मोठी लाॅटरी आहे. पण या सर्वात मोठ्या लाॅटरीला यंदा सर्वात कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळं ही लाॅटरी फ्लाॅप ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण ९०१८ घरांसाठी १४ दिवसांत फक्त ११ हजार अर्जांची स्वीकृती झाली आहे.


८ आॅगस्टपर्यंत नोंदणी

कोकण मंडळानं विरार, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील ९०१८ घरांच्या लाॅटरीसाठी १७ जुलैला जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर या लाॅटरीत सहभागी होण्यासाठी कोकण मंडळानं १८ जुलैपासून नोंदणी तर १९ जुलैपासून अर्जविक्री-अर्जस्वीकृती सुरू केली आहे. त्यानुसार १५ दिवसांत २७ हजार ४३४ इच्छुकांनी नोंदणी केली आहे. लाॅटरीत सहभागी व्हायचं असेल, अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणीधारक इच्छुकालाच अर्ज करता येतो. त्यामुळं इच्छुकांनो अर्ज भरण्यासाठी १० आॅगस्ट ही अंतिम मुदत असली तरी नोंदणी नसेल तर अर्ज भरता येणार नसल्यानं ८ आॅगस्टपर्यंत नोंदणी करून घ्या.


अर्जदारांची संख्या रोडावली

म्हाडाची लाॅटरी म्हटलं की इच्छुक लाॅटरीवर तुटून पडतात. कधीकाळी म्हाडाच्या मुंबईच्या लाॅटरीसाठी ३ लाखांहून अधिक अर्ज सादर झाले होते. पण हळूहळू अर्जदारांची संख्या रोडावू लागली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती. खासगी बिल्डराच्या स्पर्धेत म्हाडा उतरलंय की काय असा प्रश्न पडावा इतक्या म्हाडाच्या घरांच्या किंमती वाढलेल्या आहेत. त्यामुळंच अर्जदारांची संख्या कमी होत असल्याचं चित्र १९ आॅगस्टला फुटणाऱ्या लाॅटरीबाबत दिसत आहे.


'इतकी' अर्ज विक्री

अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होऊन १४ दिवस झाले, तरी अर्जविक्रीचा आकडा २१ हजार २७० च्या घरात अाहे. तर अर्जस्वीकृतीचा आकडा ११ हजारांच्या घरांत आहे. हा आकडा खूपच कमी आहे. अर्जविक्री-स्वीकृतीसाठी आता केवळ ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे या ९ दिवसात अर्जविक्री-स्वीकृतीचा आकडा किती वाढेल, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


किती जणांची नोंदणी?

नोंदणीचा विचार करता आतापर्यंत २७ हजार इच्छुकांनी नोंदणी केली असून हा आकडा ५० हजारांचा पल्ला तरी गाठतो का? हाच प्रश्न आहे. कारण ५० हजार इच्छुकांनी नोंदणी केली तर जेमतेम २५ हजारापर्यंत अर्ज सादर होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबईच्या २०१७ च्या लाॅटरीतील ८१९ घरांसाठी ६५ हजार १४७ अर्ज सादर झाले होते.

असं असताना कोकणच्या घरांचा आकडा हा मुंबईच्या गेल्यावर्षीच्या तुलनेत कित्येक पटीनं मोठा असताना २५ हजार अर्ज तरी सादर होतील का? हीच चिंता कोकण मंडळाला सतावत असेल. 



हेही वाचा-

Exclusive: म्हाडा तोंडावर आपटलं! परळमधली २९ महागडी घर विजेत्यांनी केली परत

म्हाडाची श्रीमंतांना 'लाॅटरी', उच्च गटाला १९ लाखांत तर दुर्बल गटाला १८ लाख ५० हजारांत घर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा