Advertisement

बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रकल्पासाठी एमएमआरडीएनं काढल्या नवीन निविदा

दादर शिवाजी पार्क इथल्या हेरिटेज महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाला लवकरच सुरुवात होईल.

बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रकल्पासाठी एमएमआरडीएनं काढल्या नवीन निविदा
SHARES

दादर शिवाजी पार्क इथल्या हेरिटेज महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाला लवकरच सुरुवात होईल. बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रकल्पासाठी एमएमआरडीएनं नवीन निविदा काढल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे डिझाईन, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम यासाठी नवीन निविदा नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (MMRDA)नं जारी केली आहे.

अंदाजित प्रकल्पाची किंमत सुमारे १८७.२२ कोटी रुपये आहे. इच्छुक एजन्सी २२ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत निविदा दाखल करू शकते. थकित पैसे म्हणजेच ठेव (EMD) ९४ लाख रुपये आहेत. विनेदीपूर्वीची बैठक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

निवड झालेल्या एजन्सीला प्रकल्प पूर्ण होण्यास पावसाळ्यासह १४ महिन्यांचा कालावधी मिळेल. MMRDAच्या म्हणण्यानुसार कामाच्या व्याप्तीत प्रामुख्यानं प्रवेशद्वार, कला केंद्र, व्याख्यान केंद्र, हेरिटेज संवर्धन, महापौरांचा बंगला पुनर्संचयित करणं आणि संग्रहालय आणि लँडस्केपींगमध्ये रुपांतर करणं, टप्पा १ अंतर्गत परिसर सुशोभित करणं या कामांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये एमएमआरडीएनं स्मारकाच्या कामासाठी निविदा देखील जारी केली होती.

स्मारकाच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं नोव्हेंबर २०१८ मध्ये दादरच्या ११ हजार ५०० चौरस मीटर समोरासमोर असलेली मालमत्ता बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यास (ट्रस्ट)कडे दिली होती.



हेही वाचा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द

गोराई समुद्रकिनारी पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा