Advertisement

मेट्रोला आता आरेची ६२ हेक्टर जागा हवी?


SHARES

मुंबई - मेट्रो आणि आरेचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचं दिसतंय. विकासाच्या नावावर एमएमआरसीने आरेतील 33 हेक्टर जमीन घेतली असताना आता एमएमआरडीएचाही आरेच्या जमिनीवर डोळा आहे. एमएमआरसी आणि एमएमआरडीएने आरेतील तब्बल 62 हेक्टर जागेची मागणी केलीय.

एमएमआरडीएने 6 एकर जागा इंटिग्रेटेड ऑपरेशन अॅण्ड कंट्रोल सेंटरसाठी, तर 15 एकर जागा मेट्रो प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी सरकारकडे मागितली असल्याचा दावा करण्यात आलाय. आधीच एमएमआरसीने 33 हेक्टर जागा घेतली. तसंच, एमएमआरडीएनेही जागा मागितली असल्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आल्याचा दावा एमएमआरडीएतील एका अधिकाऱ्याने मुंबई लाइव्हशी बोलताना केला. आता आरे आणि मेट्रोमध्ये सुरू झालेला हा वाद कुठे आणि कसा थांबतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा