तब्बल पाच वर्षांचा मेट्रोब्लॉक...


  • तब्बल पाच वर्षांचा मेट्रोब्लॉक...
SHARE

मुंबई - हायवेनं जाताना २४ किलोमीटर म्हणजे २०-२५ मिनिटांचा खेळ. आता तो मुंबईतला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे असेल, तर मात्र हे गणित बदलतं. २०-२५ मिनिटांचा हा खेळ सहजच तास-दीड तासाचा होतो. पण पुढची पाच वर्षं दहिसर-वांद्रे या २४ किलोमीटरच्या प्रवासाला अडीच-तीन तासही लागू शकतील. त्याचं कारण आहे मेट्रोब्लॉक. मेट्रोची ठिकठिकाणी सुरू असलेली कामं आणि त्यामुळे होणारे ट्रॅफिक जाम तुम्हाला दहिसर-वांद्रे अंतरात मुंबई-पुणे प्रवासाचं पुण्य देतील.

हा गुंता सुटण्यासाठी एमएमआरडीनं ट्रॅफिक पोलिसांना २५ कोटींची मदतही केलीये. तरीही ही गुंतागुंत पाचेक वर्षं तरी त्रास देण्याची भीती आहेच. मात्र, हे काम पूर्ण झाल्यावर मेट्रोनं किती तरी कमी वेळात आणि सुखाचा प्रवास होऊ शकेल, हे तितकंच खरं...

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या