Advertisement

84 हजार कोटी खर्चून एमएमआरमध्ये 190 किमीचे मेट्रो जाळे


84 हजार कोटी खर्चून एमएमआरमध्ये 190 किमीचे मेट्रो जाळे
SHARES

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात येत्या काही वर्षांत 84 हजार कोटी 527 लाख रुपये खर्च करत 190.08 कि. मी. चे मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

पश्चिम आणि पूर्व उपनगरासह मुंबईतल्या अधिकाधिक भागांतून मेट्रो जावी असा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यामुळे मेट्रोचा आराखडा तयार करताना प्रस्तावित मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यातील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्ग अडीच वर्षापूर्वीच सेवेत दाखल झाला आहे. तर मेट्रो-3 कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो-7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गाचे कामही वेगात सुरू असून, हे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. डि.एन.नगर ते दहिसर या मेट्रो-2 अ चे कामही एमएमआरडीएकडून सुरू आहे. या सर्व कामांवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष ठेवून आहेत. नुकत्याच सलग दोन रात्र जागून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरसी आणि एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या या तिन्ही मेट्रो मार्गांची पाहणी करत कामाचा आढावा घेतला.

वडाळा-कासारवडवली या मेट्रो-4 च्या प्रकल्पाच्या कामालाही लवकरच सुरूवात करण्यात येण्याची शक्यता आहे. या मार्गाचा जीपीओपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5, स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी मेट्रो-6 सह अन्य विस्तारीत मार्गही प्रस्तावित आहेत. या 190 किमीच्या मेट्रो मार्गांद्वारे मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.


मेट्रो मार्ग 
लांबी (किमी) 
खर्च कोटींमध्ये
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1
11.4
2356
दहिसर-डिएननगर मेट्रो 2-अ
18.6
6410
 डिएननगर-वांद्रे-मंडाले मेट्रो 2-ब
23.6
10,986
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3
33.5
23,136
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली
32.3
14,549
वडाळा-जीपीओ मेट्रो-4 विस्तारीत
8.00
2400 (अंदाजित)
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5
23.05
8417
स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-कांजूर-विक्रोळी मेट्रो-6
14.05
5566
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो -7
16.04
6278
अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व मेट्रो-7 विस्तारीत
9.00
4500 (अंदाजित)
एकूण
190.08 
84 528





Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा