Advertisement

मुंबईकरांची पुन्हा लूट


मुंबईकरांची पुन्हा लूट
SHARES

मुंबई - मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोचे भाडे वाढवण्याची घाई लागली आहे. त्यासाठी न्यायालयीन लढाईबरोबर एमएमओपीएल सरकारशीही भांडत आहे. पण एमएमओपीएलची बदमाशी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने समोर आणली आहे. मेट्रो-1 च्या करारानुसार आठ वर्षे मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करणार नाही अशी अट नमुद आहे. असे असताना मेट्रो सुरू होऊन वर्ष होत नाही तोच एमएमओपीएलने भाडेवाढ केली. त्यामुळे एमएमओपीएलने मेट्रो कराराचा भंग केल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. तसा युक्तिवादही नुकताच एमएमआरडीएकडून उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. याविषयी एमएमओपीएलच्या प्रवक्त्याला विचारले असता हे प्रकरण न्यायालयात असल्याचे म्हणत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा