मोनोरेल होणार हायटेक

वडाळा डेपो आणि जेकब सर्कल या मार्गावर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. आता मोनोरेल प्रशासनाने मोनोरेलला आणखी हायटेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

१९.५४ किलोमीटरचा जेकब सर्कल-वडाळा डेपो-चेबूर हा मार्ग ३ मार्च पासून प्रवशांसाठी सुरू करण्यात आला. त्यानंतर वडाळा डेपो आणि जेकब सर्कल या मार्गावर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. आता मोनोरेल प्रशासनाने मोनोरेलला आणखी हायटेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.


क्यू-आर कोड सिस्टम

पेपर तिकिटांऐवजी पेपरलेस तिकिटांवर भर देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यासाठी क्यू-आर कोड सिस्टम लागू करण्यावर सध्या प्रशासनाचा विचार सुरू आहे. क्यू आर कोड सिस्टम लागू केल्यानंतर प्रवाशांना आपल्या मोबाईलवरूनच कोड स्कॅन करून तिकीट बुक करता येणार आहे.


कमाईत वाढ

नवा मार्ग सुरू झाल्यानंतर मोनोरेलच्या कमाईत वाढ होऊन ती प्रति दिवस ४.५ ते ५.५ लाखांच्या दरम्यान गेली आहे. सध्या मोनोरेलच्या एका तिकिटाचा दर ६० रूपये असून मोनोरेलचे स्मार्ट कार्ड विकत घेतल्यानंतर प्रवाशांना यात १० रूपयांची सवलत देण्यात येत असल्याचंही मोनोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
हेही वाचा -

होळीनिमित्त एसटीच्या जादा बस

मंत्रालयासमोर तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
संबंधित विषय
ताज्या बातम्या