मंत्रालयासमोर तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालय परिसरात दिवसेंदिवस आत्महत्येच्या प्रयत्नांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. मंत्र्यांचं कामाचं ठिकाण हे आता सुसाईट पॉईंट झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागली आहे. असाच एक प्रकार सोमवारी मंत्रालय परिसरात घडला.

SHARE

मंत्रालय परिसरात दिवसेंदिवस आत्महत्येच्या प्रयत्नांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. मंत्र्यांचं कामाचं ठिकाण हे आता सुसाईट पॉईंट झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागली आहे. असाच एक प्रकार सोमवारी मंत्रालय परिसरात घडला. मंत्रालयासमोर एका तरूणानं अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


कर्जबाजारीपणामुळे पाऊल

सोन्या चांदीच्या व्यापारात नुकसान झाल्यानं कर्जबाजारी झालेल्या तरूणानं सोमवारी दुपारच्या सुमारास मंत्रालयातील गार्डन गेटजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. विनायक वेदपाठक असं या व्यक्तीचं नाव असून ती उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेदरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची पुढील चौकशी मरीन ड्राईव्ह पोलिस करत आहेत.


धनंजय मुंडेंकडून निषेध

या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. सरकराने २ कोटी रोजगार वर्षाला देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही. त्यामुळेच तरूणांवर अशी वेळ येत असल्याचं त्यांनी म्हटलं.


हेही वाचा -

शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा- अनिल बोरनारे

बनावट संस्थेच्या नावाने १९४ कोटी उकळले
संबंधित विषय
ताज्या बातम्या