मुंबई - राज्यातील पालिका, नगरपालिकांसोबत आता महावितरणला ही चांगले दिवस आलेत. महावितरणच्या तिजोरीत 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या अवघ्या चार दिवसांत 262 कोटी जमा झालेत. वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी 500, 1000 च्या जुन्या नोटा ग्राहकांकडून स्वीकारल्या जात आहेत. त्यासाठी सुट्टीच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत महावितरणची वीज बिल भरणा केंद्र खुली ठेवण्यात आली आहेत. आता पुढेही ही वसुली सुरू राहणार असल्याने महावितरणची तिजोरी आणखी भरेल, अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
विभागवार वसुली
कोकण - 93 कोटी 80 लाख
पुणे - 74 कोटी 83 लाख
औरंगाबाद - 49 कोटी 77 लाख
नागपुर - 43 कोटी 7 लाख