Advertisement

एसटीमध्ये 14 हजार पदांसाठी भरती


एसटीमध्ये 14 हजार पदांसाठी भरती
SHARES

मुंबई - बेरोजगार तरुणांना राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळामध्ये 14 हजार पदांसाठी भरती निघाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावत यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
एसटीमध्ये चालक, वाहक, सहाय्यक (मॅकेनिकल) आणि पर्यवेक्षक दर्जाची एकूण 14 हजार 247 पदं रिक्त आहेत. ही पदं लवकरात-लवकर भरण्याचे आदेश दिवाकर रावते यांनी दिले आहेत. त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या सहा विभागांमध्ये 7 हजार 923 चालक आणि वाहकांची भरती करण्यात येणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी 2 हजार 548 लिपीक, 3 हजार 293 सहाय्यक आणि 483 पर्यवेक्षकांची भरती लवकरच करण्यात येईल. या भरतीची सविस्तर जाहिरात 7 जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in आणि www.msrtcexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरू होईल, तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी असेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा