Advertisement

एसटीची खेळी.. बुधवारी संप न मिटल्यास कंत्राटी कामगारांची नियुक्ती


एसटीची खेळी.. बुधवारी संप न मिटल्यास कंत्राटी कामगारांची नियुक्ती
SHARES

मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत 'कामावर रूज व्हा, अन्यथा बडतर्फ करू' या एसटी महामंडळ व्यवस्थापकांच्या कडक इशाऱ्यालाही फाट्यावर मारत कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने संपकऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी नवी खेळी खेळण्याची तयारी सुरू केली असून संपकऱ्यांना आता बुधवार सकाळपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सकाळपर्यंत संप मागे न घेतल्यास संपकऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या जागी कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) मिलिंद बंड यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


२० कोटींचं नुकसान

सातवा वेतन आयोग आणि वेतनवाढ या मागण्यांसाठी एेन दिवाळीत राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उगारलं आहे. या संपामुळे एकीकडं प्रवाशांचे हाल होत ते नाराज झालेत, तर आधीच तोट्यात असलेल्या एसटीला मोठं आर्थिक नुकसानही सहन करावं लागत आहे. संप शक्य तितक्या लवकर मिटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एसटी महामंडळाला कर्मचारी भीक घालताना दिसत नाहीत. संपामुळे पहिल्याच दिवाशी एसटीला २० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हा संप एसटीला परवडणारा नसल्याने एसटी महामंडळही आक्रमक झाले असून कठोर निर्णय घेण्याच्या हालचालींना एसटी महामंडळाने वेग दिला आहे.

  

कशी असेल कारवाई?

बुधवारी सकाळपासून कामावर रूजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने निलंबित करण्याचा इशारा वजा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे हा संप संपकऱ्यांना चांगलाच महागात पडण्याची शक्यता व्यक्त आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे संपाचा वाद आणखी चिघळण्याचीही दाट शक्यता आहे.


२००० कंत्राटी कामगारांची नियुक्ती

एकीकडे कर्मचाऱ्यांना निलंबित करतानाच एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी बुधवारी २००० नव्या कंत्राटी कामगारांची तात्काळ नियुक्ती करण्याची महामंडळाची तयारी असल्याचंही बंड यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे. हे कामगार मुख्यत्वे वाहनचालक असणार असून त्यांची नियुक्ती केवळ दिवाळीपुरती वा संप मिटेपर्यंत असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.


कोण असतील कंत्राटी कामगार?

बससारखे अवडज वाहन चालवण्यासाठी पब्लिक सर्व्हिस व्हेईकल बॅज आवश्यक असतो. ज्याच्याकडे हा बॅज असेल अशा चालकांना कंत्राटी कामगार म्हणून त्वरीत रुजू करून घेण्यात येईल.



हेही वाचा -

'एक उपाशी, तर दुसरा खातो तुपाशी', एसटी संपाचा फायदा घेत खासगी वाहनांची दरवाढ

भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट बंद; 31 हजार कर्मचारी संपावर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा