Advertisement

भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट बंद; 31 हजार कर्मचारी संपावर


भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट बंद; 31 हजार कर्मचारी संपावर
SHARES

भाऊबीजेच्या दिवशी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय अवघ्या दोन दिवसांपूर्वी बेस्टने घेतला होता. पण आता याच भाऊबीजेच्या दिवशी मुंबईतले तब्बल 31 हजार बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार असल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

एकीकडे एसटी संघटनांनी सातवा वेतन आयोग तसेच बढती मिळावी या मागण्यासह संप पुकारला आहे. तर दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी भाऊबीजेच्या दिवशी 31 हजार कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्टची आर्थिक परिस्थिती सध्या तोट्यात जात असल्यामुळे बेस्ट कामगारांवर देखील संकट आले आहे. यंदाच्या दिवाळीत कर्मचाऱ्यांना बोनस मिळणे कठीण असल्याचे बेस्ट व्यवस्थापकांनी बेस्टच्या बैठकीत स्पष्ट केले होते. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट कृती समितीचे सदस्य आणि बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी नुकतीच बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्याशी देखील चर्चा केली होती.

यावर बेस्ट अध्यक्ष आणि बेस्ट समिती सदस्य देखील महापौरांना भेटून बोनससाठी विनंती करणार होते. पण प्रशासनाकडून काहीच तोडगा निघत नसल्यामुळे संपावर जाणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला तर ठीक, अन्यथा भाऊबीजेच्या दिवशी बेस्टचे 31 हजार कर्मचारी संपावर जाणार हे निश्चित.

शशांक राव, निमंत्रक, बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती

मागे काही दिवस सोशल मीडियावर 'आम्ही रक्षाबंधन साजरी केली, आता भाऊबीज देखील साजरी करू', अशा आशयाचे मेसेज फिरत होते. यावरून स्पष्ट होते की, बेस्ट कर्मचारी संपावर जाण्याच्या पूर्णपणे तयारीत आहेत. या संपामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणत हाल होणार आहेत.



हेही वाचा - 

बेस्टनंतर आता एसटी कामगारही संपावर?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा