Advertisement

भाऊबीजनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या


भाऊबीजनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या
SHARES

दिवाळी आणि भाऊबीजच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी १२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत १८ जादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत. 

सोमवारी भाऊबीजच्या दिवशी मुंबई शहर, उपनगर, मिरारोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेती बंदर, कळवा तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरुळ, एेरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर अशा विविध बसमार्गावरून एकूण १३१ ज्यादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत. 

प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दीच्या ठिकाणी आणि रेल्वे स्थानकाबाहेरील बस थांब्यावर बस निरीक्षकांची तसेच वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.


बेस्ट कर्मचारी जाणार संपावर?

एकीकडे भाऊबीजच्या दिवशी बेस्ट उपक्रमातर्फे जादा बस गाड्या सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं, तर दुसरीकडे बेस्ट कर्मचारी दिवाळी बोनसनिमित्त संपावर जाण्याच्या भूमिकेत आहेत. अशावेळी प्रवाशांचं काय होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



हेही वाचा - 

मुंबईकरांसाठी 'बेस्ट'च्या जादा बसेस

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा