Advertisement

बेस्टनंतर आता एसटी कामगारही संपावर?


बेस्टनंतर आता एसटी कामगारही संपावर?
SHARES

परिवहन विभागाकडून एसटी महामंडळतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उस्ताहाचे वातावरण आहे. पण ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.


कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्चिती, विविध भत्ते आणि सेवा सवलती मिळाव्यात या मागण्यांसह एसटी महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनांनी 17 ऑक्टोबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे दिवाळीत तसेच हंगामी काळात संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. दुसरीकडे दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे नाराज बेस्ट कर्मचारी देखील दिवाळीत संपावर जाणार आहे. यामुळे शहरात तसेच शहराबाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांचेही चांगलेच हाल होणार आहेत.


16 ऑक्टोबरपासून जाणार संपावर

महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांनी यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना संपाची नोटीस दिली होती. या संपात महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र वर्कर्स कर्मचारी, काँग्रेस आणि विदर्भ एसटी कामगार संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. या संपासाठी एसटी कामगारांनी होकारार्थी कौल दिला आहे. त्यांच्या या निर्णयावर विचार करत एसटी कर्मचारी 16 ऑक्टोबरला मध्यरात्री 12 वाजल्यापासून संपावर जाणार आहेत.

कामगारांच्या संपामुळे एसटी महामंडळाने या निर्णयाचा धसका घेत कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर कामगार न्यायालयाने 26 ऑक्टोबरपर्यंत संपाला स्थगिती दिली आहे.



हेही वाचा - 

ऐन दिवाळीत प्रवाशांचं दिवाळं, एसटीची हंगामी भाडेवाढ

खासगी बस १९, २० सप्टेंबरला संपावर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा