Advertisement

ऐन दिवाळीत प्रवाशांचं दिवाळं, एसटीची हंगामी भाडेवाढ


ऐन दिवाळीत प्रवाशांचं दिवाळं, एसटीची हंगामी भाडेवाढ
SHARES

ऐन दिवाळीत महागाईला तोंड देत असलेल्या जनतेच्या अडचणीत एसटी महामंडळाने आणखी भर टाकली आहे. एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ केल्यामुळे गावी जाणाऱ्या चकरमन्यांना चांगलाच फाटका बसणार आहे.

एसटी महामंडळाने साध्या बसच्या तिकीट दरांत १० टक्के, शिवनेरी निम आरामच्या तिकीट दरांत १५ टक्के, तर एसी बस शिवशाहीच्या तिकीट दरांत २० टक्के वाढ केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून एसटी दिवाळीत हंगामी भाडेवाढ करत आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार असून ते ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वैध असतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

एसटीसह खासगी बसकडून देखील दर वाढवण्यात आले आहेत. यामुळे यंदाच्या दिवाळीत प्रवाशांचं दिवाळं निघणार आहे.



हेही वाचा - 

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा