Advertisement

खासगी बस १९, २० सप्टेंबरला संपावर


खासगी बस १९, २० सप्टेंबरला संपावर
SHARES

वाहतूक विभागाने अवजड वाहन आणि खासगी बसला घातलेल्या मुंबईतील प्रवेशबंदीविरोधात खासगी बस मालक संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार संघटनेकडून १९ आणि २० सप्टेंबरला संप पुकारण्यात आला आहे. या संपात मुंबईतील ३३ हजार बस सहभागी होती. या ४८ तासांमध्येही जर वाहतूक विभागाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय मुंबई बस असोसिएशनने घेतला आहे.

मुंबईत रस्त्यांवर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. या वाहतूककोंडीवर आळा घाल्यण्यासाठी मुंबई वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार खासगी बस आणि जड वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत मुंबईत 'नो एण्ट्री' असेल. वाहतूक विभागाच्या या निर्णयावर मुंबई बस असोसिएशन कडून विरोध दर्शवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मुंबईतील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. या निर्णयावर नारजी व्यक्त करत गुरुवारी दुपारी मुंबई बस असोसीएशनकडून पोलीस विभागासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाहतूक विभागाने निर्णय मागे घेतला नाही मुंबईतील सर्व खासगी बस संपावर जातील, असा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे सेक्रेटरी मलिक पटेल यांनी सांगितले.

मुंबईत दररोज १ हजार ५०० बसची ये-जा होते. यातील प्रत्येक बसमध्ये किमान ४० लोक बसतात. या निर्णयामुळे सर्व प्रवाशांचे हाल होणार आहेत.
आमच्यापेक्षा प्रवाशांचा विचार करणे जास्त गरजेचे आहे. वाशीच्या पुढे राहणारे प्रवासी त्यांच्या घरी कसे पोहोचतील. यावर विचार करणे गरजेचे आहे. ओला-उबेरच्या गाड्या जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हाही ट्रॅफिक होईल. त्यांच्यावरही बंदी आणावी, असे म्हणत पटेल यांनी नाराजी व्यक्त केली.

निर्णय मागे घेतला नाही तर शुक्रवारपासून मुंबईतील शाळा आणि कंपनीसह इतर सर्व खासगी बसेस या संपावर जातील.
- मलिक पटेल, सेक्रेटरी,मुंबई बस असोसीएशन


या निर्णयाला आमची संमती नाही. येत्या दोन दिवसात आमच्या असोसीएशनकडून निर्णय घेण्यात येईल. आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे मुंबईत अनेक ट्रॅव्हल एजंसी चालवणाऱ्या सर्वांना याचा फटका बसणार आहे. हा निर्णय मागे घ्यावा.
- संदेश खेडेकर, ट्रॅव्हल एजंसी चालक


हेही वाचा - 

मुंबईत अवजड वाहनांसह खासगी बसला 'नो एण्ट्री'


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा