Advertisement

मुंबईत अवजड वाहनांसह खासगी बसला 'नो एण्ट्री'


मुंबईत अवजड वाहनांसह खासगी बसला 'नो एण्ट्री'
SHARES

मुंबईत कधी आणि कुठं वाहतूककोंडी होईल याचा काही नेम नाही. कधी भर दुपारी, तर कधी रात्रीच्या वेळी रस्त्यावर गाड्यांची रांग लागलेली असते. या सततच्या वाहतूककोंडीपासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी मुंबई वाहतूक विभागानं मुंबईत अवजड वाहनांसह खासगी बसना प्रवेश बंदी (नो एण्ट्री) केली आहे.  

दोन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाचे सहायक उपनिरीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी परिपत्रकात नमूद केलं आहे.

दक्षिण मुंबईत सकाळी ७ वाजेपासून ते थेट मध्य रात्रीपर्यंत येणाऱ्या सर्व अवजड आणि खासगी बसना मज्जाव करण्यात आला आहे. या गाड्या मुंबई शहरात केवळ १ एक वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत धाऊ शकतील. सकाळी 11 ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत येणाऱ्या खासगी बस आणि अवजड वहानांना काही मोजक्या ठिकाणांपर्यंतच प्रवेश असेल.


कसा असेल गाड्यांचा मार्ग

दक्षिण मुंबईत सकाळी 11 ते ५ दरम्यात पी डीमेलो रोडवरील मॅलेट बंदर जंक्शन, एन. एम. जोशी मार्गावर आर्थर रोड नाका, सेनापती बापट मार्गावर एल्फिन्स्टन जंक्शन, बी. ए. रोड वर शांताराम पुजारे चौक आणि अॅनी बेझंट रोडवर सेंच्युरी मिल पर्यंतच प्रवेश असेल.

इस्टर्न एक्स्प्रेस वे वर बस वगळता सगळ्याच अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उपनगरात रस्ते जरी मोठे असले तरी इथं होणारी वाहतूककोंडी मात्र तुफान आहे. त्यात पश्चिम द्रुतगती मार्गावरील तसेच लिंक रोडवरील मेट्रोच्या कामाने वाहतुकीची समस्या आणखीच वाईट झाली आहे.

उपनगरांमध्ये सकाळी ७ पासून ते 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याही अवजड वाहनांसह खासगी बसला प्रवेश बंदी आणि त्यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे.

या सगळ्यांमधून बेस्ट, एसटी बस, शाळेच्या बस, मुंबई दर्शनसाठी आलेल्या बस, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बस तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बस आणि अवजड वहानांना सूट देण्यात आली आहे.


मुंबईत दररोज ८०० खासगी बस येतात आणि दक्षिण मुंबईत ३०० च्या आसपास बस येतात. बस खाजगी असली तरी त्या मास ट्रान्स्पोर्टेशन या प्रकारांत येतात. बसचा आकार आणि त्यातील प्रवासी संख्येचा विचार करता मास ट्रान्स्पोर्टेशन आवश्यक आहे. परंतु कसलाही विचार न करता हा निर्णय लादण्यात आला आहे. अशा तुघलकी निर्णयाविरुद्ध आम्ही न्यायालयात जाणार आहोत.
- हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बस महासंघटना


हेही वाचा - 

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडी

ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा