Advertisement

एसटी संपावर, प्रवासी वाऱ्यावर


एसटी संपावर, प्रवासी वाऱ्यावर
SHARES

ऐन दिवाळी सुरू असतानाच एसटी संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. मुंबईतील प्रमुख आगरापैकी एक असलेल्या बॉम्बे सेंट्रल येथे सकाळपासून प्रवासी गर्दी करत आहेत. एसटीने पुकारलेल्या या संपामुळे वैतागलेले प्रवासी खासगी बस आणि ट्रेनचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत.



राज्यातील 250 एसटी आगारात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.  दररोज सकाळी आठ वाजेपर्यंत एसटीचे सुमारे ६ बसेस आगारातून बाहेर पडतात. पण मंगळवारी एसटीने संप पुकारल्याने फक्त १०० बसेस रस्त्यावर धावत आहेत. 


काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

वेतन करार, वेतन वाढ याचसोबत सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी संघटनांनी एकत्र येऊन हा संप पुकारला आहे. परिवहन मंत्री यांनी शासनाकडे पैसे नसल्याने सातवा वेतन आयोग लागू होणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी संप मागे घ्यावा अन्यथा कारवाई करू, असेही ते म्हणाले. पण कामगार संघटना आपल्या संपावर ठाम असल्याचे दिसत आहे. सोमवारी मध्य रात्री 12 वाजल्यापासून मुंबईतून एसटीच्या एकही बस जागेवरून हललेल्या नाहीत.



या संपामुळे त्रास होत आहे, खरतर मला गावी जायचे होते पण संपामुळे अडकून बसलोय. आता वाट बघेन आणि दुपारी 3 च्या ट्रेनने मी गावी जाणार. कामगारांनी सणासुदीच्या काळात संप पुकारून चुक केली आहे.
- अजय कोळी, प्रवासी



या संपामुळे आमचे हाल झाले आहेत. मी कामानिमित्त मुंबईला आलो होतो. आता गावी जायचे होते. पण संप असल्यामुळे सर्व अवघड झाले आहे. खरेतर याला जबाबदार प्रशासन आहे.
- अभय खर्डे, प्रवासी



हेही वाचा - 

गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या दिवाळीचं वाटोळं, मध्यरात्रीपासून एसटी कामगार संपावर



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा