SHARE

एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या संपाचा पुरेपूर फायदा उचलत खासगी वाहन चालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. तिकीटांच्या दरांत किमान दुप्पट वाढ करून प्रवाशांचे खिसे कापण्याचे प्रकार सर्वच ठिकाणी दिसून येत आहे.


तात्पुरत्या परवानगीचा फायदा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची प्रवाशांना कमी झळ बसावी, या उद्देशाने राज्य सरकारने परिपत्रक काढत खासगी बस, टॅक्सी, व्यावसायिक वाहनांना प्रवासी वाहतुकीची तात्पुरती परवानगी दिली आहे. त्यानुसार ३ हजार खासगी बस रस्त्यावर उतरवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र या खासगी बसचा फायदा होण्याऐवजी प्रवाशांना मनस्तापच अधिक सहन करावा लागत आहे.


अशी दरवाढ

मुंबई-पुणे मार्गावर एरवी ३०० रुपये तिकीट दर आकारण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत खासगी बस चालकांकडून याच मार्गावर प्रति प्रवासी ४५० रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. मुंबई-नाशिक मार्गावर नॉन एसीसाठी २५० रुपये, तर एसी बससाठी ५५० दर आकारण्यात येत आहे.

तर, एसटीने आतापर्यंत १२०० खासगी बस आणि १८०० इतर वाहनांची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे.


आमचे दर एसटी बसपेक्षाही कमी आहेत. सकाळपासून आम्ही मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक आणि इतर मार्गांवर एकूण ३०० बस गाड्या प्रवाशांसाठी पुरविल्या आहेत. एसटी आगारावर सध्या प्रवाशांची गर्दी दिसून येत नाही. मात्र संध्याकाळी गर्दीच्या हिशेबाने आम्ही ७०० ते ८०० बस पुरविणार आहोत.
- हर्षल कोटक, सचिव, खासगी बस संघटनाहेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांना पुढची २५ वर्षे ७ वा वेतन आयोग देणं अशक्य - रावतेडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या