Advertisement

एसटीला खासगी बसचा पर्याय, प्रवाशांचा त्रास सोडवणार कसा?


एसटीला खासगी बसचा पर्याय, प्रवाशांचा त्रास सोडवणार कसा?
SHARES

एसटी कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा राज्यभरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'मोटर वाहन नियमा'नुसार सर्व खाजगी बसला प्रवासी वाहतुकीस तात्पुरती मान्यता देण्यात आली आहे.


'या' वाहनांचा समावेश

यामध्ये प्रवासी बस, स्कूल बस, विविध कंपन्यांच्या मालकीच्या बस, माल वाहतुकीच्या वाहनांचा समावेश आहे. मात्र, सरकारचा हा निर्णय प्रवाशांच्या कितपत फायद्याचा ठरेल हा मोठा प्रश्नच अाहे.


खेड्यापाड्यातील सेवा कोलमडणार

एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपात राज्यभरातील १ लाख ७ हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचा राज्यातील १८ हजार ६०० बसद्वारे चालविण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होणार आहे. सहाजिकच प्रवाशांना खेड्यापाड्यात घेऊन जाणाऱ्या एसटीची सेवा यामुळे कोलमडणार आहे.


खासगी बसला फायदा

त्यामुळेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकरातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी एसटी कामगरांच्या या निर्णयामुळे खासगी बस चालकांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला आर्थिक खाईत चाललेल्या एसटीला आणखी तोटा होणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच एसटीने दिवाळीसाठी तिकीटदरांत हंगामी वाढ केली होती. तसेच विशेष गाड्याही चालवण्याचा निर्णय घेतला होता.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी संघटना संपावर कायम आहेत.



हेही वाचा -

भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट बंद; 31 हजार कर्मचारी संपावर

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा