मुंबई लाइव्हच्या दणक्यानंतर म्हाडाला जाग

 Pali Hill
मुंबई लाइव्हच्या दणक्यानंतर म्हाडाला जाग

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेखाली सर्वसामान्यांची कशी फसवणूक होत आहे यासंबंधीची सविस्तर बातमी मुंबई लाइव्हवर प्रसिद्ध झाल्यानंतर म्हाडा खडबडून जागी झाली आहे. ही बाब थेट म्हाडाशी संबंधित नसल्यानं कारवाईचा प्रश्नच येत नसल्याचा दावा करणाऱ्या म्हाडाने आता मात्र याप्रकरणी कारवाई करण्याचं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. दरम्यान म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी शनिवारी, 23 डिसेंबरला मुंबई लाइव्हवर पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली फसवणूक ही बातमी पाहिल्याबरोबर कारवाईचे आदेश दिल्याचे मुंबई लाइव्हला सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी म्हाडाच्या दक्षता विभागाकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. ज्या-ज्या ठिकाणी असे अर्ज भरून घेतले जात आहे त्या-त्या ठिकाणांची पाहणी आणि तपासणी दक्षता विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या दलाल आणि दुकानांवर कारवाई करत ही दुकाने बंद करण्यात येणार असल्याचं दक्षता विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Loading Comments